Homeताज्या बातम्या*फलटण ग्रामीण पोलिसांची गांजा लागवडीवर धडक कारवाई .७ किलो हून अधिक गांजाची...

*फलटण ग्रामीण पोलिसांची गांजा लागवडीवर धडक कारवाई .७ किलो हून अधिक गांजाची झाडे जप्त*

फलटण ग्रामीण पोलिसांची गांजा लागवडीवर धडक कारवाई; ७ किलोहून अधिक गांजाची झाडे जप्

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण

फलटण प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत गांजाची लागवड करणाऱ्या व्यक्तीवर धडक कारवाई करत ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या गांजाची अंदाजे किंमत ३४ हजार ६५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत २५ जून २०२६ रोजी फलटण तालुक्यातील गुणवरे गावातील घुलेवस्ती परिसरात एका घराशेजारी गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला. कारवाईदरम्यान ७ किलो १४३ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे आढळून आली. याप्रकरणी अंकुश रामचंद्र कोळेकर (रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे, संतोष मठपती तसेच शांतीलाल ओंबासे, योगेश रणपिसे, सागर अभंग, तुषार नलवडे, अमोल देशमुख आणि अविनाश शिंदे यांनी सहभाग घेतला.

फलटण ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून नागरिकांनी अशा अवैध प्रकारांची माहिती पोलिसांना गोपनीयपणे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा*

0
*फलटण येथे दिया मेगा फेस्टिव्हल अॅण्ड कार्निवाल फलटण २०२६ चा उद्या उद्घाटन सोहळा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण संकल्प ऑर्गनायझेशन बारामती लायन्स क्लब ऑफ फलटण...

मुधोजी कॉलेजमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा: “ग्रंथवाचन ही काळाची गरज” – प्रा. डॉ....

0
मुधोजी कॉलेजमध्ये 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात साजरा: "ग्रंथवाचन ही काळाची गरज" - प्रा. डॉ. सीता जगताप समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण: फलटण एज्युकेशन सोसायटीच्या येथील 'मुधोजी...

error: Content is protected !!