Homeताज्या बातम्या*मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश* *लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात...

*मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश* *लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध कला प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी*

मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचे घवघवीत यश

लोकवाद्यवादनात प्रथम, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय; विविध कला प्रकारांतही उल्लेखनीय कामगिरी

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

फलटण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आणि मुधोजी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त आयोजनात झालेल्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. विविध कला प्रकारांत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत महाविद्यालयाच्या सांस्कृतिक परंपरेत मानाचा तुरा रोवला.

या महोत्सवात महाविद्यालयाने लोकवाद्यवादन या स्पर्धेत प्रथम क्रमांक, एकल लोकवाद्यवादनात द्वितीय क्रमांक, लघुपट स्पर्धेत तृतीय क्रमांक, तसेच लोककला, मूकनाट्य, नकला आणि पश्चिमात्य एकल वाद्यवादन या प्रकारांत चतुर्थ क्रमांक मिळवला. स्थळचित्रणात तृतीय क्रमांक, भित्तीचित्र निर्मिती पोस्टर स्पर्धेत पंचम क्रमांक आणि इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत पंचम क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची छाप उमटवली.

या यशाबद्दल सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एल. सी. वेळेकर आणि सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, कलात्मक अभिव्यक्ती, सातत्यपूर्ण सराव आणि मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान आहे.

  1. फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम, डॉ. टी.पी. शिंदे, सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक, सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि विभागातील सर्व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

मुधोजी महाविद्यालयाच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती*

0
बरड येथे महामार्ग ओलांडताना अपघातात व्यक्तीचा मृत्यू; फलटण ग्रामीण पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे बरड येथे...

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण*

0
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2.0 चा शुभारंभ; २०२५-२६ च्या पुरस्कारांचे वितरण समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत...

*धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल*! *प्रभाग क्रमांक १८५ आणि...

0
धारावीत कचऱ्याचे ढीग; घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर मनसेचा सवाल! समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. मुंबई प्रभाग क्रमांक १८५ आणि ९० फूट मार्गावरील कचरा न उचलल्याने नागरिक...

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

error: Content is protected !!