गोखळी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश तानाजी गावडे पाटील यांची निवड.
प्रतिनिधी. सुमित काळे
फलटण पूर्व भागातील शंभर वर्ष परंपरा असलेली सहकारातील गोखळी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी गोखळी येथील योगेश तानाजी गावडे पाटील यांची निवड झाल्याने त्यांचा भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचा सत्कार केला.
आज नुकतीच गोखळी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन पदी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थक व भारतीय जनता पार्टीचे युवा नेते योगेश तानाजी गावडे पाटील यांची निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीबद्दल माजी खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील जिल्हा बँकेचे माजी संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा अभिजीत जगताप मनोज तात्या गावडे यांच्यासह गोखळी व गोखळी परिसरातून अभिनंदन होत आहे.


























