श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; १५ फुटी भव्य आकाशकंदील ठरतोय फलटणकरांचे आकर्षण!
फलटण : प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक फलटण नगरी धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपत आली आहे. याच फलटण नगरीतील रविवार पेठ, तालीम चौक येथील श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाने २०१८ मध्ये मंडळाच्या वतीने श्रीमंत जय भारत गणेश मंदिराची उभारणी केली.
मंदिराची स्थापना झाल्यापासून प्रत्येक दिवाळी पाडव्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मंदिराची आकर्षक सजावट करण्याची परंपरा जपली जात आहे. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना आणि पद्धतीने झेंडूच्या फुलांची मनमोहक सजावट केली जाते. यंदाही मंडळाने ही परंपरा अखंडित ठेवत श्री गणेश मंदिराची अतिशय सुंदर आणि आकर्षक पुष्पसजावट केली आहे.
या फुलांच्या सजावटीचे दर्शन घेण्यासाठी तसेच श्री गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थिती लावत आहेत. मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या दिवाळीचे विशेष आकर्षण ठरतोय १५ फुटी भव्य आकाशकंदील!
श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळाने यंदा उभारलेला तब्बल १५ फुटी भव्य आणि दिव्य आकाशकंदील फलटण शहरवासीयांचे विशेष आकर्षण ठरत आहे. आकर्षक रोषणाई आणि भव्य स्वरूपामुळे हा आकाशकंदील पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. दिवाळीच्या आनंदात या आकाशकंदिलामुळे आणखी भर पडली आहे.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने जपलेली धार्मिक परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि उत्सवातील नावीन्यपूर्ण उपक्रम यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीमंत जय भारत गणेशोत्सव मंडळातर्फे सर्व फलटणकर नागरिकांना व गणेशभक्तांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
🪔💐🎇🎉🎊🪔


























