Homeताज्या बातम्याबारामती एस.टी. स्टँडवर पडलेली भिंत तातडीने बांधावी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

बारामती एस.टी. स्टँडवर पडलेली भिंत तातडीने बांधावी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेची मागणी

फलटण दि.२८| फलटण एस.टी. डेपोत असलेल्या बारामती स्टँडवरील उत्तर बाजूची संरक्षण भिंत एस.टी. बस मागे घेताना धडकून कोसळून पाच ते सहा महिने उलटले तरी ती अद्याप बांधण्यात आलेली नाही. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, सदरील भिंत तातडीने पुन्हा बांधण्यात यावी, अशी मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने आगार प्रमुख, फलटण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर ठिकाणी बसस्थानकाबाहेर पडण्यासाठी एक गोलाकार गेट असून तेथे बांधकाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात खडी, कचरा व बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांसह वयोवृद्ध महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना याच मार्गाने जावे-येणे भाग पडत आहे. भिंत पडल्यामुळे अनेकांना चारीत पडून जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत.

तसेच, एस.टी. बसची प्रतीक्षा करणाऱ्या महिला व विद्यार्थिनींना टवाळखोरांच्या हावभावाचा सामना करावा लागत असून, पाकीटमार व भुरट्या चोरट्यांसाठी हा मार्ग सुरक्षित ठिकाण बनला आहे. परिणामी प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत तातडीने उपाययोजना करून पडलेली भिंत पुन्हा उभारावी, अशी ठाम मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या उड्डाणाला 14 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्याने प्रवाशांना त्रास होतो

पुणे: एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने लखनौ आणि दिल्लीला जाणाऱ्या १०० हून अधिक प्रवाशांना बुधवारी १४ तासांपेक्षा जास्त उशीर झाला.उड्डाण (IX-1618), मूळत: 4.30 वाजता निघणार...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

विनाअनुदानित महाविद्यालये खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करण्यासाठी धोरण तयार करण्यासाठी तज्ञांची समिती

0
पुणे : अधिक स्वायत्तता आणि गती मिळावी यासाठी विनाअनुदानित सरकारी महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी महाराष्ट्र उच्च व तंत्रशिक्षण विभागाने...

*फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहे*

0
फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतात वनक्षेत्रातील झाडांची तोड वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत नियंत्रित असून, कोणत्याही...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

0
पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

error: Content is protected !!