Homeताज्या बातम्याकालकथित वंदना बजरंग काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण

कालकथित वंदना बजरंग काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण

बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांच्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

फलटण:दि३०| मौजे हिंगणगाव ता. फलटण जि. सातारा येथील कालकथित वंदना बजरंग काकडे यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम 29 ऑगस्ट 2025 रोजी पार पडला. मात्र पारंपरिक पद्धतीला छेद देत काकडे कुटुंबियांनी बौद्ध धम्मातील विज्ञानवादी विचारांचा अंगीकार करून पर्यावरण संवर्धनासाठी नवा मार्ग स्वीकारला.

सामान्यतः मृत्यूनंतर अस्थी प्रवाही पाण्यात विसर्जित करण्याची प्रथा रूढ आहे. परंतु भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांनी बौद्ध धम्मातील पर्यावरण रक्षणाचा दृष्टिकोन कुटुंबियांसमोर मांडला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थी विसर्जन प्रवाही पाण्यात न करता त्या स्वतःच्या रानात मिसळून स्मृती प्रित्यर्थ बोधिवृक्ष पिंपळ व आंब्याची झाडे लावण्यात आली.

या उपक्रमामुळे केवळ दिवंगत व्यक्तींच्या स्मृतींचा सन्मानच झाला नाही तर पर्यावरण संवर्धनाचा आदर्शही पुढे ठेवला गेला. हिंगणगावातील ग्रामस्थ, बौद्ध उपासक-उपासिका तसेच नातेवाईक व आप्तेष्ठ यांनी या अभिनव निर्णयाचे स्वागत केले.

या वेळी बौद्धाचार्य मोहिते यांनी भगवान गौतम बुद्धांच्या धम्म विचारांवर आधारित उपदेश दिला. त्यांनी सांगितले की, “जग हे अनित्य आहे. आपल्या जिवलगांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी वृक्षारोपण ही सर्वोत्तम पद्धत आहे. हा उपक्रम येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

या निर्णयात काकडे कुटुंबीयांचा मोठा सहभाग होता. यावेळी उपस्थित असलेल्या धीरज बजरंग काकडे, सूरज भीमराव काकडे, सागर जगदीश बागडे, ताराचंद बापूराव काकडे, अभिजीत प्रकाश कांबळे, गणेश संतोष जगताप, ॲड. सरेंद्र सरतापे, विशाल राजेश काकडे तसेच इतर ग्रामस्थांनी प्रत्यक्ष वृक्षारोपणात सहभाग घेतला.

हा उपक्रम पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा ठरला असून, स्मृतीप्रीत्यर्थ करण्यासाठी एक नवा आदर्श निर्माण करणारा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्राची गणना आजपासून सुरू होत असताना नागरिकांना उत्तर देण्यासाठी 33 प्रश्न

डॉ निरुपमा जे डांगे | भारत सरकारचे सहसचिव आणि महाराष्ट्राचे मुख्य प्रधान जनगणना अधिकारी" decoding="async" fetchpriority="high"/>डॉ निरुपमा ज डांगे | भारत सरकारचे सहसचिव...

*एका बाजूला “पर्यावरण वाचवा”चे संदेश दिले जात असताना दुसऱ्या बाजूला वाढलेली झाडे तोडली जात...

फलटण वनखात्याकडून अक्षम्य चूक समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. शहरातील विमानतळ शेजारील वन विभागाच्या जागेत असलेल्या झाडांची अचानक तोड झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली...

*फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरुच महसूलाला कोट्यावधींचा फटका कारवाईची मागणी तीव्र*

फलटण तालुक्यात मळीची अवैध वाहतूक सुरूच; महसूलाला कोट्यवधींचा फटका, कारवाईची मागणी तीव्र   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यात विनापरवाना मळीची अवैध वाहतूक...

ISC, ICSE टॉप स्कोअरर्स प्लॅनिंगवर अवलंबून असतात, चिकाटी देतात

यावर्षी ICSE परीक्षेत महाराष्ट्रातील मुलांनी मुलींच्या 99.93% उत्तीर्णतेशी बरोबरी केली, ही एक महत्त्वपूर्ण बदल आहे. मुलींनी ISC निकालांमध्ये आपली आघाडी कायम ठेवली असताना,...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

error: Content is protected !!