Homeताज्या बातम्या२० व्या राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात कोल्हापूर परिक्षेत्र उपविजेता

२० व्या राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात कोल्हापूर परिक्षेत्र उपविजेता

पुणे / सातारा, दि. २० सप्टेंबर पुणे येथे पार पडलेल्या २० व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-२०२५ मध्ये कोल्हापूर परिक्षेत्रीय संघाने तब्बल ७ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्य पदकांची कमाई करून सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले.

दि. १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या मेळाव्याचे आयोजन राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांनी केले होते. राज्यातील पोलीस आयुक्तालये, परिक्षेत्रे, सीआयडी, एमआयडीसी, फोर्सवन, रेल्वे, एसआरपीएफ, एटीएस यांसह २६ संघांनी सहभाग नोंदवला होता.

मेळाव्याचा समारोप १९ सप्टेंबर रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २, पुणे येथे झाला. या वेळी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक मा. श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

कोल्हापूर परिक्षेत्राच्या कामगिरीत सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अधिकारी-अंमलदारांचा मोठा वाटा आहे.

सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन : अन्वर मुजावर (सपोनि, सातारा) – १ सुवर्ण, १ रौप्य

पोलीस फोटोग्राफी : रघुनाथ शिंदे (पुणे ग्रामीण) – १ सुवर्ण

घातपात विरोधी तपासणी : संदीप पांडव (सातारा) – १ सुवर्ण, १ रौप्य; अमोल गवळी (सातारा) – १ रौप्य

कॉम्प्युटर अवेरनेस : निखील जाधव (सातारा) – २ सुवर्ण; प्रसाद मांढरे (सोलापूर ग्रामीण) – १ सुवर्ण, १ कांस्य; अजय सावंत (कोल्हापूर) – १ सुवर्ण

श्वान स्पर्धा : सातारा जिल्हा पोलीस दलाचे श्वान व श्वानहस्तक दत्तात्रय चव्हाण व सचिन भोसले – १ सुवर्ण

एकूण १२ पदकांची कमाई करून परिक्षेत्राने कॉम्प्युटर अवेरनेस विनर ट्रॉफी व फोटोग्राफी विनर ट्रॉफी देखील पटकावल्या.

या यशासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबनीस यांनी मार्गदर्शन केले.

आगामी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा-२०२५ याचे आयोजन यंदा महाराष्ट्रात होत असून नोव्हेंबर महिन्यात नागपूर येथे स्पर्धा रंगणार आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान...

0
डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण...

0
🌺 मातृदेवता : संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाची जिवंत मूर्ती! 🌺 समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या आयुष्याला...

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

error: Content is protected !!