Homeताज्या बातम्या26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसात वाढ अपेक्षित

26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसात वाढ अपेक्षित

विविध भागांमध्ये पावसात वाढ आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावीत

दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे 

मुंबई, दि 25: बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, आणि त्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात किमान 5 ऑक्टोबर पर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही.

26 तारखेला दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपार नंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते. यात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात आभाळी हवामान आणि हलका पाऊस पडू शकतो.

26 तारखेच्या तुलनेत 27 आणि 28 ला राज्यात पावसाच्या प्रमाणात आणि क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. 27 तारखेला दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात नांदेड, लातूर धाराशिव, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित मराठवाड्यात देखील पावसात वाढ होऊ शकते, ज्यामुळे या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याच बरोबर दक्षिण विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, तर उर्वरित विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा लगतचे मध्य महाराष्ट्रातील जिल्हे, जसं की सोलापूर, इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पाडण्याचे संकेत आहे. या दिवशी खानदेशात प्रामुख्याने हलका पाऊस पडू शकतो.

28 तारखेला इतर भागांच्या तुलनेत पावसाचा जोर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अधिक राहण्याची शक्यता आहे. या दिवशी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच बरोबर मुंबई महानगरात (मुंबई शहर, ठाणे आणि पालघर जिल्हे) पाऊस अपेक्षित आहे, ज्यातील काही भागात देखील मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचे संकेत आहे. पश्चिम विदर्भ, पश्चिम मराठवाडा आणि खानदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, तर उर्वरित विदर्भात प्रामुख्याने हलका पाऊस पडू शकतो.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. दक्षिण मराठवाडा; कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जिल्हा बँकेचे बिनविरोध संचालक झाल्याच्या प्रित्यर्थ...

0
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जिल्हा बँकेचे बिनविरोध संचालक झाल्याच्या प्रित्यर्थ नगरसेवक संदीप चोरमले यांच्याकडून पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करत भव्य आनंदोत्सव...

माळजाई मंदिरातील नवरात्र व दसरा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न! देवीची आकर्षक आरास,...

0
माळजाई मंदिरातील नवरात्र व दसरा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न! देवीची आकर्षक आरास, विद्युत रोषणाई, दांडिया, महिला मंडळांचे भजन-कीर्तन आणि पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त...

सातारा जिल्हा बँकेत रणजितदादा बिनविरोध

0
सातारा जिल्हा बँकेत रणजितदादा बिनविरोध   समर्थ 24 तास न्यूज.नेटवर्क   सातारा, दि. २१ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी   बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह...

नातपेते पोलीस ठाण्याचा वाहनधारकांना कडक इशारा! सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल, फटाक्यांसारखे आवाज आणि स्टंटबाजी...

0
नातपेते पोलीस ठाण्याचा वाहनधारकांना कडक इशारा! सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल, फटाक्यांसारखे आवाज आणि स्टंटबाजी केल्यास कायदेशीर कारवाई फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क वाहनांमध्ये अनधिकृत बदल...

बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेबरोबरच बुद्धविचारांचे आचरण आणि बाबासाहेबांचे संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन

0
बुद्धमूर्तीच्या प्रतिष्ठापनेबरोबरच बुद्धविचारांचे आचरण आणि बाबासाहेबांचे संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण : बुद्धविहार हे केवळ बुद्धमूर्ती असलेले धार्मिक स्थळ न...

error: Content is protected !!