Homeताज्या बातम्याराज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने अनुकंपा उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस

पुणे, दि. २६ सप्टेंबर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय योजना व उपक्रमांचा प्रभावी अंमल सुरू असून या कार्यक्रमात अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती हा एक महत्वाचा उपक्रम ठरला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला गती देण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

विशेष मेळावा आणि मार्गदर्शन

जिल्हाधिकारी कार्यालय येथे ३ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या विशेष मेळाव्यात उमेदवारांना शासन निर्णय, नियमावली व नियुक्ती प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते. उमेदवारांचा पसंतीक्रम निश्चित करून नियुक्तीसाठी संबंधित विभागांकडे शिफारसी पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभागीय स्तरावर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याची कार्यवाही सुरू आहे.

गटवार नियुक्ती प्रक्रिया

गट-क पदाकरिता प्रतिक्षा यादीतील १६२ उमेदवारांपैकी ९७ उमेदवारांना नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली असून गट-ड पदाकरिता प्रतिक्षा यादीतील २४१ उमेदवारांपैकी १४७ उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अन्य नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे आणखी ४६ उमेदवारांची शिफारस पाठविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रक्रियेत पारदर्शकता, गती आणि सर्वसमावेशकतेवर विशेष भर दिला आहे. ते म्हणाले की, “शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळेल आणि त्यांचे पुनर्वसन सुलभ होईल. त्याचबरोबर शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध होऊन कामकाजात गती येईल. जिल्ह्यात ही प्रक्रिया पारदर्शक व सुलभ पद्धतीने राबविण्यात येत असून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने ही कार्यवाही वेळेत पूर्ण करावी.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी...

Dy.RTO सचिन विधाते साहेब यांच्या हस्ते समर्थ नायक साप्ताहिक पेपरचे अनावरण करताना व त्यांचा...

उप प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते यांची नियुक्ती समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून...

दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांच्या सहा चित्रपटांचे पुनर्संचयित आणि इटलीतील चित्रपट महोत्सवात प्रदर्शन

पुणे : दिग्गज चित्रपट निर्माते ऋत्विक घटक यांचे सहा चित्रपट शहर-आधारित डिजिटल फिल्म रिस्टोरेशन कंपनीने पुनर्संचयित केले आहेत आणि ते बोलोग्ना, इटली...

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण मुख्याध्यापक जयवंत सावंत यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न   दालवडी, प्रतिनिधी :...

पुणेकरांचा मुलगा लोहगड किल्ल्यावर 400 फूट पडून अपघात नव्हे खून; मंगेतर आणि तिच्या पुरुष...

लोहगड किल्ल्यावरील पुण्यातील एका ट्रेकरच्या (एल) मृत्यूने सुरुवातीला अपघाती वळण घेतले आहे. पोलिसांना आता संशय आहे की त्याची मंगेतर (आर) आणि तिच्या पुरुष...

error: Content is protected !!