Homeताज्या बातम्याम्हाडाच्यावतीने नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यात येतील - पुणे म्हाडाचे सभापती...

म्हाडाच्यावतीने नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यात येतील – पुणे म्हाडाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील

पुणे, दि. २६ सप्टेंबर : केंद्र व राज्य शासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना २.० शहरी राबविण्यात येत असून याकरिता केंद्र वा राज्य शासनाकडून अनुदान उपलबध करुन देण्यात येत आहे. म्हाडाच्यावतीनेही पुणे जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेअंतर्गत मुळशी तालुक्यातील नेरे आणि खेड तालुक्यातील रोहकल येथे घरे उपलब्ध करून देण्यात येतील- असे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे (म्हाडा) सभापती शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) प्रलंबित विषयाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, म्हाडाचे मुख्याधिकारी राहूल साकोरे, तहसीलदार शिरूर बाळासाहेब म्हस्के, शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यापुढे श्री. डुडी म्हणाले, म्हाडाने रोहकल व नेरे येथे प्रस्तावित प्रधानमंत्री आवास योजनेतील नागरिकांना रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधांसह इतर सामाजिक सुविधा उपलब्ध होतील अशा रितीने प्रकल्प आराखडा तयार करावा, गृहनिर्माण प्रकल्पाबाबत जागेचे सर्वेक्षण करावे, जिल्हा प्रशासनाच्यावतीने अशा सुविधांसाठी जागा व निधीची उपलब्धता करुन देण्यात येईल.

स. क्र. ५३२ शिरूर ग्रामीण येथील पुणे म्हाडाच्या २ हेक्टर जागेचा वापर ग्रामपंचायत शिरूर ग्रामीण व रामलिंग देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून यात्रेदरम्यान वाहनतळ तसेच बैलगाडा शर्यतीसाठी केला जात असल्याने अद्यापपर्यंत गृहनिर्माण योजना राबविता आली नाही. याबाबत या जागेवर म्हाडामार्फत गृहनिर्माण योजना राबविल्यास गरजूंना घरे उपलब्ध होतील असे सांगून म्हाडास योजना राबविण्यास मार्ग मोकळा करून द्यावा अशा सूचना रामलिंग देवस्थान ट्रस्ट व सरपंच शिरूर ग्रामीण यांना श्री. डूडी यांनी दिल्या.

स. क्र. ११४३ शिरूर येथील म्हाडाच्या जागेशेजारील कचरा डेपो इतरत्र हलविल्यास या जागेवर म्हाडास गृहनिर्माण योजना राबविणे भविष्यातील सदनिका धारकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोयीचे होईल, असे श्री. आढळराव पाटील यांनी विशद केले. याबाबत शिरुर नगरपरिषदेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यास गोलेगाव ग्रामंपचायतीने तयारी दर्शवली, सबब चाकण व राजगुरुनगरच्या धर्तीवर गोलेगाव येथील पर्यायी जागेवर संयुक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबतचा प्रस्ताव नगरपरिषदेने सादर करावा, अशा सूचना श्री. डुडी यांनी दिल्या.

शिरुर तालुक्यातील पाबळ येथे म्हाडामार्फत गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीने मागणी केल्याचे सभापती श्री आढळराव पाटील यांनी सांगितले. याबाबत सदर जागा गृहनिर्माणासाठी उपयुक्त असल्यास शासनामार्फत म्हाडास जमीन उपलब्ध करून देता येईल, असे श्री. डुडी म्हणाले.

श्री. थोपटे यांनी म्हाडाने स्वस्तात व मागणी असलेल्या ठिकाणी नागरिकांना घरे उपलब्ध करून द्यावीत, तसेच त्यांना हक्काच्या घरांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना केली.

श्री. साकोरे यांनी म्हाडाच्यावतीने नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगून आगामी काळात अधिकाधिक नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजे सांगवी, फलटण येथील दुर्गा दौड मधील गुन्ह्याबाबत

0
मौजे सांगवी, फलटण येथील दुर्गा दौड मधील गुन्ह्याबाबत समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सांगवी, ता. फलटण येथे आज दिनांक 20/10/2026...

*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तींचे विसर्जन न करता नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन* *समशेरसिंह*नाईक निंबाळकर* ...

0
**दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तींचे विसर्जन न करता नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन* *समशेरसिंह*नाईक निंबाळकर* नगराध्यक्ष* *फलटण नगर परिषद* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण **पाण्याची बचत व जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी...

वाठार निंबाळकर येथे हिट अँड रन; २७ वर्षीय महिलेचा मृत्यू दुचाकीला अज्ञात चारचाकीची...

0
वाठार निंबाळकर येथे हिट अँड रन; २७ वर्षीय महिलेचा मृत्यू दुचाकीला अज्ञात चारचाकीची समोरून धडक; पती व दोन मुली जखमी, चालक फरार फलटण, प्रतिनिधी : समर्थ...

माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या संकटावर तोडगा काढण्यासाठी माजी...

0
माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी संकटावर तोडगा काढण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांची मुख्यमंत्र्यांशी भेट! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दुष्काळाची परिस्थिती मांडली; दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळण्याची...

फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने...

0
फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त... समर्थ 24 तास न्यूज...

error: Content is protected !!