Homeताज्या बातम्यासासकल जन आंदोलन समितीच्या प्रयत्नांना यश : फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाण...

सासकल जन आंदोलन समितीच्या प्रयत्नांना यश : फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाण रस्ता दुरुस्तीसाठी ५ लाख निधी मंजूर

फलटण दि.२९ | फलटण-दहिवडी रस्ता ते सासकल गावठाणास जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था, जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्यालगत वाढलेले काटेरी कुंपण यामुळे नागरिकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत होता. या रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेक छोटे-मोठे अपघात झाले होते. शेवटी सासकल जन आंदोलन समितीच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीला यश मिळाले आहे.

सदर प्रश्नावर तोडगा निघण्यासाठी सासकल जन आंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी हरिबा मुळीक, उपाध्यक्ष विनायक नारायण मदने, सासकल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सोनाली मंगेश मदने, ग्रामपंचायत सदस्य हणमंत गंगाराम मुळीक, चांगुणा सर्जेराव मुळीक, राजेंद्र धोंडीबा घोरपडे, लक्ष्मीबाई रमेश आडके,सामाजिक कार्यकर्ते व भैरवनाथ फाउंडेशनचे ज्ञानेश्वर हरिबा मुळीक, दिनेश दत्तात्रय मुळीक यांच्यासह सर्व पदाधिकारींनी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतली.

ग्रामस्थांच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून माजी खासदार निंबाळकर यांनी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्याशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावर आमदार सचिन पाटील यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधत सासकल गावासाठी क्र. 402 जा. क्र. ग्रापं-04/कावि/4848/2025 नुसार ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अशा स्पष्ट सूचना देखील आमदारांनी दिल्या. यामुळे सासकल ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीची पूर्तता झाली आहे.

सासकल जन आंदोलन समिती व ग्रामस्थांच्या वतीने आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले : रोहित पवार

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याने बारामतीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक डोके वर काढत असल्याचा दावा...

नवीन बससेवेचे उद्दिष्ट हिंजवडी तंत्रज्ञांना 70 मार्गांवर प्रवासात दिलासा देण्याचे आहे

पुणे : शहरातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांत वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांशी सामना करावा लागत आहे....

बलात्कार, फसवणूक आणि ‘धन्य वस्तू’: नाशिकच्या ज्योतिषी ‘भोंदू बाबा’वर ईडीची पकड, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली...

‘भोंदू बाबा’ अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावले आहे नवी दिल्ली: स्वयंघोषित गॉडमन अशोक खरात याला 'भोंदू बाबा'...

महा सर्वेक्षण पॉलिसीसाठी 54L एकल महिलांची ओळख पटवते, संख्या 75L पर्यंत वाढू शकते

पुणे: महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी सांगितले की, अशा एकल महिलांची संख्या आता 54 लाखांच्या आसपास आहे, परंतु समाजातील या विभागासाठी...

संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात वाढ, पण उष्माघाताच्या रुग्णांची संख्या 175 पर्यंत खाली आली; मृत्यू 6

पुणे: महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात तापमानात वाढ होऊनही उष्माघाताच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येते, ज्यामुळे अहवाल प्रणालीच्या अचूकतेबद्दल नवीन चिंता निर्माण...

error: Content is protected !!