Homeताज्या बातम्याप्रतीक जगताप व प्रकाश कार्ले यांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

प्रतीक जगताप व प्रकाश कार्ले यांची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

पुणे दि.२९| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत, मु सा काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर, बारामती येथे आयोजित केलेल्या आंतर विभागीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत वाघिरे महाविद्यालय, सासवड येथील खेळाडू प्रतीक जगताप याने ९७ किलोग्रॅम खालील वजन गटात व प्रकाश कार्ले याने ७४ किलोग्रॅम खालील वजन गटात सुवर्ण पदक पटकावून हरियाणा येथे संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात स्थान मिळविले.

सोमेश्वरनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाईल व ग्रिकोरोमन ह्या दोन्ही प्रकारात मिळून पुणे शहर, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा असे एकूण ०४ विभागांतील विविध महाविद्यालय शिक्षण घेणारे १६० कुस्तीगीर सहभागी झाले होते.

प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देविदास वायदंडे, सहाय्यक क्रीडा संचालक डॉ.सुदाम शेळके, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती सचिव डॉ.अमेय काळे, सहसचिव डॉ.गणेश चव्हाण, खजिनदार डॉ.सुहास बहिरट, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ.बाळासाहेब मरगजे या मान्यवरांच्या हस्ते प्रतीक जगताप व प्रकाश कार्ले यांचा सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.

सदर दैदिप्यमान कामगिरीबद्दल खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ.बी.यु.माने, डॉ.संजय झगडे, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.प्रितम ओव्हाळ यांनी अभिनंदन केले.

दोन्ही विजेते खेळाडू श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल येथे प्रशिक्षक पै.तानाजी बोडरे व पै.माऊली खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई वडील, कुटुंबीय, माजी आमदार संजय जगताप, प्रशिक्षक, सहकारी मल्ल, क्रीडा संचालक यांना दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत** *फेरफार करून* *लाखोंचा अपहार*; *नगराध्यक्ष...

फलटण पालिकेतील कर घोटाळा उघड! ऑनलाईन करप्रणालीत फेरफार करून लाखोंचा अपहार;   नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा खुलासा   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण     महानेट सॉफ्टवेअरमधील कथित छेडछाड,...

सिया गोयलचे नशीब: हत्येचा आरोप एक गोष्ट आहे, सिद्ध करणे ही दुसरी गोष्ट आहे

सिया गोयल आणि केतन अग्रवाल "दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष"नवी दिल्ली/पुणे: एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याची मंगेतर आणि तिचा कथित प्रियकर तुरुंगात आहेत....

*फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

फलटणजवळ वारकऱ्यांवर दरोडेखोरांचा हल्ला! फलटणजवळ दिंडी चालकाची ७० हजारांची लूट, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह   फलटण   विठुरायाचे दर्शन घेऊन आषाढी वारी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परत निघालेल्या बीड जिल्ह्यातील...

पोलिस प्रमुखांच्या अहवालानंतर कोंढवा येथील अतिरिक्त सीपी कार्यालयाचा निर्णय, राज्यमंत्री कदम | पुणे बातम्या

कोंढवा पोलिस ठाण्याबाहेर जमाव जमला पुणे : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत बोलताना सांगितले की, अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत...

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

error: Content is protected !!