Homeताज्या बातम्यासाताऱ्यात फुटलेल्या फरशीवरून अजितदादांची ‘चाणक्य नजर’ : जिल्ह्यात चर्चा रंगली

साताऱ्यात फुटलेल्या फरशीवरून अजितदादांची ‘चाणक्य नजर’ : जिल्ह्यात चर्चा रंगली

सातारा दि. ३ ऑक्टोबर –राजकारणातील स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनाकडे चाणक्य नजरेने पाहण्याची ख्याती असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शुक्रवारी सकाळी अचानक सातारा शासकीय विश्रामगृहात आले. वर्षभरापूर्वी विस्तारीकरण झालेले हे विश्रामगृह नेहमीप्रमाणे चार मंत्र्यांच्या सातारा दौऱ्यामुळे गजबजलेले होते. मात्र, जाताना अजितदादांच्या काळ्या काचेच्या गॉगलमधूनही फुटलेली फरशी सुटली नाही.

विश्रामगृहाच्या पायरीजवळील फुटलेल्या फरशीकडे त्यांनी थेट बोट दाखवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांना नवल वाटले. “अजितदादांच्या नजरेतून काहीही सुटत नाही” अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

सातारा जिल्ह्याला सध्या चार मंत्री मिळाल्यामुळे (पालकमंत्री शंभूराजे देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले) विकासकामांना वेग आला असला, तरी शासकीय विश्रामगृहातील पावसाळ्यातच बिघडलेली अवस्था अजितदादांच्या बारकाईच्या नजरेतून सुटली नाही.

आता ही फुटलेली फरशी नव्याने बसवली जाणार यात शंका नाही, मात्र अजितदादांनी प्रशासनाला दिलेला हा ‘कडक इशारा’ जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तळेगाव मंदिरात 1.3 किलोचा चांदीचा मुकुट पुन्हा चोरीला गेला

पुणे23 मे रोजी तळेगाव दाभाडे येथील मंदिरातून चोरट्यांनी पहिल्यांदा तुळजाभवानी देवीचा 1.3 किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरला.एका अज्ञात व्यक्तीने भक्त असल्याचे भासवून...

सायबर फसवणूक पीडितांना प्रत्येक खेचर खात्यातून 50k पर्यंत पैसे मिळू शकतात

बनावट स्टॉक ट्रेडिंग ॲप्लिकेशनद्वारे गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर घोटाळेबाजांकडून तेल्लापूर येथील एका ४७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरने ३.२६ कोटी रुपये गमावले आहेत. पीडितेने...

पोलिसांचा संपर्क विचित्र गुन्हेगारी पीडितांसोबत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो

वारजेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील पोहोच सत्रात पुणे : पुणे पोलिस आणि शहर-आधारित LGBTQIA+ गट दीर्घकाळापासून विश्वासातील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत...

महाराष्ट्रात पिकअप व्हॅन विहिरीत पडून ९ जणांचा मृत्यू

TOI सिटी डेस्क ही पत्रकारांची एक अविभाज्य टीम आहे जी तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर देशभरातील शहरांची नाडी आणण्यासाठी समर्पित आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वाचकांसाठी...

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

error: Content is protected !!