Homeताज्या बातम्याबनवडी येथे पोलिसांच्या पुढाकाराने घडला ऐतिहासिक संगम ;हजरत दर्गा संदल व नवरात्री...

बनवडी येथे पोलिसांच्या पुढाकाराने घडला ऐतिहासिक संगम ;हजरत दर्गा संदल व नवरात्री मिरवणुकीची अभूतपूर्व भेट ; एकीचे दुर्मिळ दर्शन

सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या प्रयत्नांना यश – गावात धार्मिक ऐक्याचा नवा अध्याय

बनवडी (ता. कोरेगाव) गावाच्या इतिहासात कधीही न घडलेला अभूतपूर्व प्रसंग शुक्रवारी बनवडी येथे अनुभवायला मिळाला. हजरत पीर दस्तगीर दर्ग्याची संदल मिरवणूक आणि बनवडी सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाची मिरवणूक यांची ऐतिहासिक भेट घडून आली. या दुर्मिळ संगमाचे श्रेय पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराला जाते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या समन्वयातून व प्रयत्नातून दोन वेगळ्या धार्मिक परंपरांच्या मिरवणुका एकत्र आल्या आणि बंधुता, ऐक्य व सौहार्दाचे दर्शन घडले. गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत या घटनेला उत्साहाचे स्वरूप दिले.

ज्येष्ठ नागरिकांच्या मते, यापूर्वी बनवडीच्या इतिहासात असे दृश्य कधीही पाहायला मिळाले नव्हते. दोन्ही समाज एकत्र आल्यामुळे गावात सामाजिक ऐक्याचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ही घटना फक्त बनवडीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण परिसरात धार्मिक सौहार्द व सामाजिक सलोख्याचा संदेश पसरवणारी ठरली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे गावात शांतता, बंधुता आणि मैत्रीचे नवे बीज रुजले आहे.

गावकऱ्यांनी एकमुखाने पोलिस प्रशासनाचे आभार मानले असून, “हेच खरे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे,” अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लग्नाच्या काही महिने आधी, मंगेतरसोबत वाढदिवसाला निघालेल्या २६ वर्षीय पुण्याच्या तरुणाचा, लोहगड किल्ल्यावर ४००...

छायाचित्रे काढण्याच्या प्रयत्नात केतन विशाल अग्रवाल 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर छायाचित्रे काढत...

सेना (UBT) दोन खासदारांना मागे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे

सेनेचे (UBT) आमदार अंबादास दानवे आणि आमदार कैलास पाटील यांना उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मुंबई ईशान्येचे खासदार संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क...

FYJC साठी 15L पेक्षा जास्त जागा, 23 जून रोजी तिसरी गुणवत्ता यादी

पुणे : यावर्षी FYJC साठी दुसरी नियमित प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 15,71,662 जागा रिक्त आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या...

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोसायट्या, मतदान अधिकारी बांधील

पुणे : बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) ला रहिवाशांपर्यंत पोहोचण्यास आणि या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या मतदार यादीच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) मध्ये...

पुणे कोर्टाने हेरगिरी प्रकरणी डीआरडीओच्या वरिष्ठ शास्त्रज्ञावर आरोपपत्र दाखल केल्यानंतर तब्बल 3 वर्षांनी आरोप...

“ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खटला सुरू होईल,” विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी TOI ला. (AI प्रतिमा) पुणे: दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ३०...

error: Content is protected !!