Homeताज्या बातम्या*सामाजिक कार्यकर्ते हनुमंत लोंढे यांची बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशनच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी...

*सामाजिक कार्यकर्ते हनुमंत लोंढे यांची बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशनच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती* *

*सामाजिक कार्यकर्ते हनुमंत लोंढे यांची बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशनच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती*

फलटण: बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशन (BBCA) तर्फे सातारा जिल्ह्यातील संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. हनुमंत लोंढे यांची सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दि. १५ मार्च २०२६ रोजी आयोजित BBC Business & Start-up Conclave 2026 या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री. लोंढे यांना हा पदभार सोपविण्यात आला.

या कार्यक्रमात बीबीसीचे माजी अध्यक्ष श्री. शामराव वाकोडे आणि विद्यमान अध्यक्ष श्री. प्रशांत तुळवे यांच्या हस्ते श्री. हनुमंत लोंढे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सातारा जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांना एकत्र आणून व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करणे तसेच समाजातील आर्थिक प्रगतीसाठी एक सक्षम व्यासपीठ उभे करणे हे बीबीसीचे मुख्य उद्दिष्ट आहे. श्री. हनुमंत लोंढे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात बीबीसीचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी बीबीसीच्या कोर टीमतर्फे श्री. हनुमंत लोंढे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास खालील पदाधिकारी उपस्थित होते:संतोष येवले – सचिव, महाराष्ट्र राज्य,धम्मदीप गवा गुरु – खजिनदार, महाराष्ट्र राज्य,निलेशदादा नितनवरे – कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य,विशाल गायकवाड – प्रवक्ते, महाराष्ट्र राज्य,प्रशांतदादा घोगरे – संघटक, महाराष्ट्र राज्य,अभय नगरे – सोशल मीडिया प्रमुख, महाराष्ट्र राज्य,नितीनदादा गवई – संघटक, महाराष्ट्र राज्य,संतोष शिंदे – अध्यक्ष, मावळ तालुका,

नवीन मगदूम – सोशल मीडिया प्रमुख, पुणे जिल्हा,अनिता बलाढ्य – अध्यक्ष, महिला आघाडी, पिंपरी चिंचवड,विशाखा गायकवाड – अध्यक्ष, मावळ तालुका

महिला आघाडी,अतुल रोकडे – अध्यक्ष, पिंपरी चिंचवड,याशिवाय बीबीसीचे इतर पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

बुद्धिस्ट बिझनेस कम्युनिटी असोसिएशन ही संस्था “By the Community, For the Community” या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन समाजातील उद्योजकांना एकत्र आणण्याचे व नव्या पिढीला उद्योग-व्यवसाय क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहे.

यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना हनुमंत लोंढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील उद्योजक व व्यापाऱ्यांचे मजबूतन संघटन उभारणे, नव उद्योजकांसाठी मार्गदर्शन व व्यवसाय विकास कार्यशाळा आयोजित करणे, शासनाच्या योजना अनुदानित व सहकारी क्षेत्रातील संधी यांची माहिती तळागाळात पोहोचवणे, उद्योग व सहकार क्षेत्रात युवकांना सक्रियपणे जोडण्यासाठी विशेष अभियान राबवणे यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे-लोणावळा रेल्वे विभागात भूस्खलन; 16 गाड्या रद्द, अनेक वळवल्या

पुणे: मध्य रेल्वेच्या आग्नेय (पुणे-लोणावळा) घाट विभागात सोमवारी पहाटे मोठी दरड कोसळल्याने पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत गाड्यांसह एकूण 16 गाड्या रद्द करण्यात आल्या...

*अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद...

अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे सकाळी ११:३० वाजता सभेचे आयोजन; ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांचे आवाहन. समर्थ...

*सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल*

सुरवडीजवळ मेंढपाळ कुटुंबास मारहाण, शिवीगाळ आणि कुऱ्हाडीने जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण : फलटण तालुक्यातील सुरवडी गावालगत घडलेल्या एका धक्कादायक...

*अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी*

अतिमुसळधार पावसाचा इशारा; सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शाळांना आज सुट्टी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण   फलटण .दि. ६ जुलै : भारतीय हवामान विभागाने (IMD) सातारा...

पावसाळ्याचा कहर: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, भूस्खलनानंतर जुना महामार्ग बंद, मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत |...

सार्वजनिक सल्लागारात, अधिकृत हँडलवरील महामंडळाने सांगितले की, द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावरील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील. पुणे: घाट विभागात दरड कोसळल्याने...

error: Content is protected !!