Homeताज्या बातम्याकोळकीतील खासगी क्लासमध्ये पाचवीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण! शिक्षिकेसह नववी-दहावीतील काही विद्यार्थ्यांविरुद्ध...

कोळकीतील खासगी क्लासमध्ये पाचवीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण! शिक्षिकेसह नववी-दहावीतील काही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; दहा वर्षीय मुलाच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे वन

कोळकीतील खासगी क्लासमध्ये पाचवीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण!

शिक्षिकेसह नववी-दहावीतील काही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; दहा वर्षीय मुलाच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे वन

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

फलटण, प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील कोळकी येथील एका खासगी क्लासमध्ये पाचवीत शिकणाऱ्या दहा वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षिकेसह काही विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. काठी, हात आणि झाडूने मारहाण केल्याचा आरोप असून, मुलाच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे व्रण दिसून आले आहेत. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षिकेसह नववी व दहावीतील काही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी माने असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून, खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

क्लासमधून घरी आल्यानंतर मारहाणीचा प्रकार उघड

तक्रारदार संतोष पांडुरंग कुदळे (वय ४५, रा. कसबा पेठ, फलटण) यांचा मुलगा जयदीप कुदळे हा फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये पाचवीत शिकत आहे. तो कोळकी येथील एका खासगी क्लासमध्ये नियमित जात होता.

तक्रारीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी मारुती कवडे हे घरी आले होते. मुलाला क्लासला पाठवायचे नसल्याचे सांगितले असतानाही त्याला पूर्वपरवानगीशिवाय क्लासमध्ये नेण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास मुलाला घरी आणण्यात आले.

घरी आल्यानंतर जयदीप आंघोळ करत असताना त्याच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे व्रण असल्याचे वडिलांच्या निदर्शनास आले. त्यांनी मुलाकडे विचारणा केली असता, क्लासमध्ये झालेल्या मारहाणीचा प्रकार त्याने सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शिक्षिकेसह इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण केल्याचा आरोप

मुलाने दिलेल्या माहितीनुसार, क्लासमध्ये खेळण्याच्या कारणावरून शिक्षिका अश्विनी माने यांनी त्याला काठीने व हाताने मारहाण केली. तसेच नववी आणि दहावीतील काही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्याकडूनही मारहाण करवून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारानंतर वडिलांनी मुलाला घेऊन फलटण शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मुलाला वैद्यकीय उपचारांसाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. पुढील उपचारांसाठी त्याला बारामती येथे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित खासगी क्लासमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या फुटेजमध्ये मारहाणीचा प्रकार कैद झाला असल्याची चर्चा असली, तरी त्याबाबत अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.

या प्रकरणी शिक्षिकेसह नववी-दहावीतील काही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?

शिक्षणासाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालक आपल्या पाल्यांना शाळा व खासगी क्लासमध्ये पाठवतात. मात्र, तेथेच विद्यार्थ्यांना मारहाणीला सामोरे जावे लागत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याच्या नावाखाली शारीरिक मारहाण करणे योग्य नाही. या घटनेची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार; श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या फलटण फेस्टिव्हल २०२६ चा...

0
शहराचा पुसट झालेला सांस्कृतिक वारसा गडद करण्याचे काम फलटण फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू! माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार; श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या फलटण फेस्टिव्हल २०२६...

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा.

0
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भोंडल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात...

सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई...

0
सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी फलटण, प्रतिनिधी : सांगवी येथे...

जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास...

0
जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास मनाई; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण २४ ते...

मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान

0
मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क मुधोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. ललित...

error: Content is protected !!