फलटण दि.१०| जिल्हा परिषद शाळा, निरगुडी येथील विद्यार्थीप्रिय शिक्षक व सर्वांचे लाडके म्हणून परिचित असलेले सचिन शंकर काकडे यांचे आज पहाटे अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
स्वभावाने मनमिळावू आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे काकडे सर शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यातही नेहमी आघाडीवर असायचे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी व समाजातील अंधश्रद्धांविरुद्ध जनजागृती घडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.त्यांच्या अकस्मात जाण्याने फलटण सह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


























