Homeताज्या बातम्या*टाकळवाडेत 2, नेत्रतपासणी व एनसीएमसी नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ४२ रक्तदात्यांचे रक्तदान,...

*टाकळवाडेत 2, नेत्रतपासणी व एनसीएमसी नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ४२ रक्तदात्यांचे रक्तदान, १६० जणांची नेत्रतपासणी*

टाकळवाडेत 2, नेत्रतपासणी व एनसीएमसी नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ४२ रक्तदात्यांचे रक्तदान, १६० जणांची नेत्रतपासणी

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

शिवराज्याभिषेक दिन तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त टाकळवाडे (ता. फलटण) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिर, मोफत नेत्रतपासणी शिबिर आणि एनसीएमसी कार्ड नोंदणी अभियानास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेची जाणीव जपत ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर १६० नागरिकांनी नेत्रतपासणी करून घेतली. तसेच ९३ महिला,ज्येष्ठ नागरिकांची एनसीएमसी कार्ड नोंदणी करण्यात आली.

जय तुळजाभवानी मंडळ व समस्त ग्रामस्थ टाकळवाडे यांच्या वतीने श्री पद्मावती देवी मंदिर परिसरात या बहुउपयोगी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध सेवांचा लाभ घेतला.

रक्तदान शिबिरात ४२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत गरजू रुग्णांसाठी जीवनदायी योगदान दिले. “रक्तदान हेच जीवनदान” या संदेशाला प्रतिसाद देत अनेक युवकांनी प्रथमच रक्तदानाचा अनुभव घेतला. रक्तदात्यांचा आयोजकांच्या वतीने गौरव करण्यात आला.

यावेळी एच. डी. देसाई आय हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिरात १६० नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. सुमारे १०० गरजू लाभार्थींना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर नेत्रदोष आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञांचा सल्ला देण्यात आला.

राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास सवलतींसाठी आवश्यक असलेल्या एनसीएमसी कार्ड नोंदणी अभियानालाही मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत ९३ महिला,ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली.

गावात सामाजिक जाणीव जोपासत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवत जय तुळजाभवानी मंडळ व समस्त ग्रामस्थांनी पुन्हा एकदा लोकहिताचा आदर्श निर्माण केला. प्रसिद्धीपेक्षा समाजसेवा आणि जनकल्याणाला प्राधान्य देणाऱ्या युवकांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

रक्तदान, आरोग्य सेवा आणि नागरिक सुविधा यांचा त्रिवेणी संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, समाज परिवर्तनासाठी गावात सुरू असलेले प्रयत्न प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जुन्नर वनविभागाला 2 नवीन बिबट्या बचाव केंद्रे

गेल्या काही वर्षांपासून जुन्नरचा उसाचा पट्टा बिबट्यांचा सुरक्षित अधिवास बनला आहे पुणे: केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने (CZA), जुन्नर वनविभागातील मानव-प्राणी संघर्ष कमी करण्याच्या उपायांचा...

घरगुती एलपीजीच्या किमती पुन्हा वाढल्याने रहिवाशांना बजेटचा सामना करावा लागत आहे

पुणे शहरात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत आता 944.50 रुपये आहे पुणे : हांडेवाडीचे रहिवासी प्रतीक मुणगेकर आणि त्यांच्या पत्नीने वाढत्या इंधन आणि स्वयंपाकाच्या...

पाईप गॅस घोटाळ्यात बिल्डरची २.५५ लाखांची ऑनलाइन फसवणूक

पुणे : पाइप्ड गॅस कंपनीचे अधिकारी म्हणून भासवणाऱ्या ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी, बिल्डरने पाइप्ड गॅसची थकबाकी भरली नाही, असे सांगून शहरातील बिल्डरची २.५५...

इंद्रायणी पूररेषेच्या आत पुण्यातील मोई फाटा येथे एनजीटी पॅनेलने 20 बंगल्यांना झेंडा दाखवला; पाडण्याची...

चिखली येथील घटनास्थळापासून मोई फाटा परिसर सुमारे 2.5 किमी अंतरावर आहे (चित्रात) जेथे PCMC ने मे 2025 मध्ये इंद्रायणी नदीच्या पूररेषेत बांधलेले 36...

पाटबंधारे विभागाचे मुख्यालय पुण्याबाहेर हलवण्याच्या योजनेचा आढावा घेण्याची सरकारला आम आदमी पार्टीची विनंती

पुणे : पाटबंधारे विभागाचे मुख्यालय पुण्याहून कोल्हापूर आणि सोलापूरला हलवण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी सोमवारी...

error: Content is protected !!