Homeताज्या बातम्याडॉ.बाबासाहेब आमची शान, संविधान आमची जान” – मोहनलाल पाटील

डॉ.बाबासाहेब आमची शान, संविधान आमची जान” – मोहनलाल पाटील

साताऱ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे संविधान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

सातारा/प्रतिनिधी | दि.१७| “डॉ.बाबासाहेब आमची शान आहे आणि संविधान आमची जान आहे. त्यामुळे तरुणांनी संविधानाच्या रक्षणासाठी नेहमीच तयार राहिले पाहिजे,” असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांनी साताऱ्यात आयोजित संविधान जनजागृती कार्यक्रमात केले.

राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने आणि मोहनलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सातारा जिल्हा अध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला.

संविधानाचे महत्व अधोरेखित

मोहनलाल पाटील म्हणाले, “भारतीय संविधान हेच प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समानतेचा आत्मा आहे. त्यामुळे संविधानाची जागृती सर्व स्तरांमध्ये झाली पाहिजे. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. येणाऱ्या काळात चैत्यभूमी ते दीक्षाभूमी संविधान सन्मान जनजागृती यात्रेचे आयोजन करण्यात येईल. या चळवळीत १८ पगड जातीतील तरुणांनी सामील होणे आवश्यक आहे.”

कार्यकर्त्यांचा सहभाग

या कार्यक्रमास राष्ट्रीय सहसंघटन मंत्री कैलासभाऊ जोगदंड, राजेश ओव्हाळ, सोमनाथ धोत्रे, संग्राम रोकडे, सुरेश पवार, सुनील ओव्हाळ, विनोद ओव्हाळ, महिला अध्यक्ष दामिनी निंबाळकर, सुमित जगताप, नीतू खवळे, मनिषा सोनवणे, स्वाती गायकवाड, सुप्रिया येवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कैलासभाऊ जोगदंड म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचा झंझावात सुरू आहे. दादासाहेब ओव्हाळ यांच्या कार्यातून महाराष्ट्रात अनेक भीमसैनिक घडवले जातील. समाजासाठी सकस विचारांची चळवळ उभारल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही.”

प्रमुख उपस्थिती आणि आयोजन

सातारा शहराध्यक्ष राजेंद्र होतकर, युवक शहराध्यक्ष शाहरुख शेख, सलीम बागवान, सलीम शेख, शाहिद कुरेशी, आशपाक शेख यांच्यासह वडार, धनगर, मुस्लिम बांधव यांचा मोठा सहभाग होता.

कार्यक्रमाचे आयोजन सातारा जिल्हा अध्यक्ष विजय ओव्हाळ यांनी केले. कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अमित मोरे, खंडाळा तालुका अध्यक्ष पवन धायगुडे, अध्यक्ष सनीदेव खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुधोजी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन फलटण:

0
मुधोजी महाविद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फ. ए. सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग...

🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर...

0
🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सर्पदंश व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत...

शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा...

0
शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध; जुनी पेन्शन, TET सक्ती रद्द आणि १०० टक्के अनुदानासह विविध प्रश्नांवर...

फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

0
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार? फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज...

राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने...

0
राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने धुव्वा; फलटणच्या संघाची स्पर्धेत दणदणीत आगेकूच समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

error: Content is protected !!