Homeताज्या बातम्यामहामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

खंडाळा : पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा व अतिव्यस्त मार्ग आहे. या मार्गावरील खंडाळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. या अतिक्रमणामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना जागा कमी मिळत होती, अपघातांचा धोका वाढत होता तसेच वाहतूक कोंडी निर्माण होत होती.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व स्थानिक प्रशासनाने संयुक्त कारवाई करत आज मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवले. सकाळपासूनच महसूल विभाग, पोलिस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेसीबी, पोकलेन, क्रेन यांच्या साहाय्याने हॉटेलसमोरील बेकायदेशीर शेड, शेडींग्ज, पार्किंगसाठी बांधलेले कॉंक्रिट स्ट्रक्चर तसेच होर्डिंग्ज काढण्यात आले.

या कारवाईत सुमारे १४ हॉटेल्स व अनेक जाहिरात फलकांवर हातोडा चालवण्यात आला. काही व्यावसायिकांनी स्वेच्छेने अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर काही ठिकाणी प्रशासनाला पोलिस बंदोबस्तात तोडफोड करावी लागली.

अतिक्रमण हटविल्यानंतर महामार्गावरील जागा मोकळी झाल्यामुळे वाहतूक सुलभ झाली असून अपघातांचा धोका कमी होणार आहे. प्रशासनाने या कारवाईनंतर स्पष्ट केले की,महामार्गावरील सुरक्षितता धोक्यात आणणारे कोणतेही अतिक्रमण सहन केले जाणार नाही.भविष्यात पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले असून वाहनचालकांनीही प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर...

0
🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सर्पदंश व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत...

शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा...

0
शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध; जुनी पेन्शन, TET सक्ती रद्द आणि १०० टक्के अनुदानासह विविध प्रश्नांवर...

फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

0
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार? फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज...

राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने...

0
राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने धुव्वा; फलटणच्या संघाची स्पर्धेत दणदणीत आगेकूच समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

0
### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती समर्थ 24 तास...

error: Content is protected !!