Homeताज्या बातम्याडॉ. हमीद दाभोळकर यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर

डॉ. हमीद दाभोळकर यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर

सातारा:- सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘राव बहादूर संभाजीराव मोरे दुदुस्कर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार अंधश्र‌द्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते आणि मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोळकर यांना जाहीर झाला आहे. सोमवार, दिनांक 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार विख्यात विधीज्ञ सुभाष (बापू) पाटील यांचे हस्ते डॉ. हमीद दाभोळकर याना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती कला व वाणिज्य महावि‌द्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांनी दिली. सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था कला व वाणिज्य महावि‌द्यालय, सातारा व दुदुस्कर कुटुंबीयांतर्फे दरवर्षी सामाजिक शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस ‘रावबहादूर संभाजीराव मोरे दुदुस्कर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जेष्ठ कार्यकर्ते आणि मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. डॉ. हमीद दाभोळकर हे अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विवेकवादी आणि विज्ञाननिष्ठ विचारसरणी युवकांमध्ये रुजवण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक वाहिनी यांच्या माध्यमातून डॉ. दाभोळकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक विचारसरणीचा नेहमीच प्रचार केला आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याचा सन्मान म्हणून यावर्षीच्या सामाजिक कृतज्ञता पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी कला व वाणिज्य महाविद्‌यालय साताराच्या प्रांगणात सकाळी ठीक १० वाजता संपन्न होणार आहे. सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन श्री जयेंद्र चव्हाण हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. संस्थेचे विद्यमान सचिव मिलिंद घाडगे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच निलेश मोरे दुदुस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भीमाशंकर मंदिरात मोफत दर्शन सुविधा पुन्हा सुरू, सुरू असलेल्या कामांमध्ये गर्दीमुळे गर्दी व्यवस्थापनाची चिंता...

आठवड्याच्या शेवटी, धार्मिक कार्यक्रमांदरम्यान आणि संपूर्ण पावसाळ्यात गर्दी आणखी वाढेल अशी अधिकाऱ्यांची अपेक्षा आहे पुणे : विख्यात ज्योतिर्लिंग देवस्थान असलेल्या भीमाशंकर मंदिरात जवळपास...

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशिवाय सेनेत कोणताही गट नाहीः शहा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (अत्यंत डावीकडे) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अत्यंत उजवीकडे) यांच्या उपस्थितीत शनिवारी कोल्हापुरात 'धन्यवाद सभे' दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

विलीन झालेल्या भागातील रहिवासी पर्यायी दिवसाच्या वेळापत्रकानुसार दररोज एक तास पाणीपुरवठ्यासाठी दाबतात

नळ कोरडे पडत असल्याने शहराच्या काही भागात खाजगी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे पुणे : पुण्याच्या विलीन झालेल्या भागातील रहिवासी आणि...

एमआयडीसी हद्दीबाहेरील औद्योगिक क्षेत्रांनाही पाण्याची समस्या भेडसावते | पुणे बातम्या

पिण्याच्या उद्देशाने, लहान उत्पादक 20-लिटर पाण्याच्या कॅनवर अवलंबून असतात पुणे : एमआयडीसी क्षेत्राबाहेरील औद्योगिक क्लस्टर्सना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नगरपालिका क्षेत्रांमध्ये...

‘हे कलियुग आहे’: २००६ च्या खून खटल्यातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर पवनराजे...

खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी 2006 मध्ये वडील माजी मंत्री पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयाने पद्मसिंह पाटील आणि इतर सात जणांची निर्दोष...

error: Content is protected !!