Homeताज्या बातम्या*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन...

*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू*

ब्रेकिंग न्यूज
कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू*३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता ठरलागुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झालीपुणे टेकडीची आत्महत्या : ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील समोर येतात‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची शक्यतापुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेशआळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्यावाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या‘2 महिला सहकाऱ्यांनी अनुकूल काम नाकारले, तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले’: पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी मृत्यूच्या चिठ्ठीत काय लिहिले

दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

तक्रारदारांचा आरोप; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

फलटण, प्रतिनिधी : दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली असून तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे, तत्कालीन ग्रामसेवक विष्णुपंत खोमणे, त्यानंतरचे ग्रामसेवक नंदकुमार ओव्हाळ तसेच शिपाई नारायण ननावरे व ज्ञानदेव बनकर यांच्याविरोधात चौकशी सुरू असल्याची माहिती तक्रारदार तानाजी कोलवडकर यांनी दिली आहे.

तक्रारीनुसार, सन २०१९ ते जून २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या कर वसुली आणि आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर करांची वसुली करूनही संबंधित रक्कम ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदीत अथवा बँक खात्यात जमा न झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

तसेच डुप्लिकेट पावती पुस्तके वापरून कर वसुली करण्यात आल्याचा, विविध विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तसेच अनेक ग्रामस्थांकडे अशा पावत्या उपलब्ध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांतील सर्व आर्थिक नोंदी, बँक व्यवहार, पावती पुस्तके आणि विकासकामांची कागदपत्रे यांची स्वतंत्र समितीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीत नमूद केल्यानुसार, शिपाई नारायण ननावरे यांनी काही रक्कम घेतल्याची कथित कबुली दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाला झालेल्या कथित आर्थिक नुकसानीची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, तक्रारदारांनी आणखी गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, शिपाई नारायण ननावरे व ज्ञानदेव बनकर यांनी तत्कालीन सरपंच मधुकर आबू शिंदे यांच्या संगनमताने कथितपणे आधारकार्डातील जन्मतारखांमध्ये बदल करून सेवा मुदत वाढवून घेतली. निवृत्तीनंतरही शिपाई पदासाठी मिळणाऱ्या शासकीय अनुदानाचा लाभ घेत शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या प्रकरणात संबंधितांविरोधात गुन्हे दाखल होणे अपेक्षित असतानाही काही अधिकारी संबंधितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

याबाबत आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करून चौकशीला गती न दिल्यास ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तक्रारदार तानाजी कोलवडकर यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

पुणे टेकडीची आत्महत्या : ‘ऑनलाइन मित्राची’ वैवाहिक वितुष्ट, रजेवरून महिला सहकाऱ्यांचा छळ; नवीन तपशील...

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: कामाच्या ठिकाणी होणारा छळ, कौटुंबिक शोकांमुळे रजा मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पत्नीच्या दीर्घ आजाराचा ताण यामुळे...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

error: Content is protected !!