**दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तींचे विसर्जन न करता नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याचे आवाहन*
*समशेरसिंह*नाईक निंबाळकर* नगराध्यक्ष*
*फलटण नगर परिषद*
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
**पाण्याची बचत व जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन**
**फलटण :** सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची टंचाई लक्षात घेता, देवीच्या मूर्तींचे कमी पाणी साठा असणाऱ्या पाण्यात विसर्जन न करता त्या फलटण नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, उपलब्ध जलसाठ्यांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. धार्मिक परंपरांचा आदर राखतानाच पाण्याची बचत आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने देवीच्या मूर्तींचे कमी पाणी असणाऱ्या जलाशयात विसर्जन करण्याऐवजी पर्यायी व्यवस्था स्वीकारणे आवश्यक आहे.
तरी फलटण शहरातील सार्वजनिक देवी मंडळे, घरगुती देवीची प्रतिष्ठापना करणारे नागरिक आणि देवीभक्त यांनी मूर्तींचे विसर्जन न करता त्या नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्याबाबत सहकार्य करावे. मूर्ती नगरपरिषदेकडे सुपूर्त करण्यात याव्यात काही दिवसानंतर पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर पवित्र राखून नगर परिषद कडून मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.
दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याची बचत करणे, जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देणे, देवीच्या मूर्तीचे पावित्र्य राखणे हा या आवाहनामागील प्रमुख उद्देश आहे. नागरिकांनी धार्मिक श्रद्धा जपत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
नगरपरिषदेकडून मूर्ती स्वीकारण्याची अधिकृत व्यवस्था फलटण नगर परिषद जल शुद्धी करण केंद्र सोमवार पेठ फलटण येथे करण्यात आली आहे.
मूर्ती विसर्जना करिता
विनोद जाधव 9860850350,
घोलप तात्या 7020598362,
अक्षय राक्षे 7385077369 या क्रमांकावर संपर्क साधावा.
समशेरसिंह नाईक निंबाळकर
नगराध्यक्ष
फलटण नगर परिषद


























