Homeताज्या बातम्यानवरात्र उत्सवानिमित्त निरगुडी गावातील भैरवनाथ तरुण मंडळाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त निरगुडी गावातील भैरवनाथ तरुण मंडळाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप

फलटण निरगुडी  भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी प्रा. श्रेयस कांबळे यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले व रमाबाई आंबेडकर या महामातांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी केले.

प्रमुख वक्ते प्रा. श्रेयस कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. “योग्य व्यक्तीकडेच योग्य मार्गदर्शन मिळते, त्यामुळे चांगल्या लोकांशी संपर्क ठेवा,” असे आवाहन त्यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते हनुमंत केंगार व नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे आटपाडी तालुका अध्यक्ष अमित आयवळे यांनी पुढील वर्षी हा उपक्रम अधिक जोमाने राबविण्याची ग्वाही दिली. तर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय लकडे यांनी मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला प्रदीप मोहिते, ढवळ गावचे उपसरपंच गणेश गोरे, बापूराव केंगार, सुनील जाधव, ॲड. भोसले, ॲड. बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मंडळाचे अध्यक्ष सुरज गोरे यांनी मानले.

यावेळी माजी अध्यक्ष तानाजी गोरे, निलकुमार गोरे, भिकाजी गोरे, सुनिल गोरे, अनिल गोरे, लहू गोरे, प्रविण गोरे, रघुनाथ गोरे, सागर गोरे, अमित आवटे, आदेश गोरे, देवराज गोरे, आदित्य गोरे, साईराज गोरे, शंभूराज गोरे, समीर गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व महिलावर्ग उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा.

0
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भोंडल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात...

सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई...

0
सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी फलटण, प्रतिनिधी : सांगवी येथे...

जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास...

0
जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास मनाई; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण २४ ते...

मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान

0
मुधोजी महाविद्यालयाचे प्रा. ललित वेळेकर यांना पीएच.डी. प्रदान फलटण : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क मुधोजी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. ललित...

दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि...

0
📰 दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री केल्यास कारवाईचा इशारा! फलटण तहसील कार्यालयाचा इशारा; सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 तास न्यूज...

error: Content is protected !!