फलटण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ, फलटण यांच्या वतीने शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर श्रीमंत रामेश्वर महागणपती मंदिर, शुक्रवार पेठ, फलटण येथे सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.
रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचे महत्त्वपूर्ण कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मंडळाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
“आरोग्य यज्ञात सहभागी होऊ या, रक्तदान करून देशकार्य आणि देवकार्यात सहभागी होऊ या,” असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात युवक, गणेशभक्त, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे


























