Homeताज्या बातम्याबौद्ध उपासक-उपासिकांनी धम्माचे आचार-विचारांचे पालन करावे – चंद्रकांत मोहिते

बौद्ध उपासक-उपासिकांनी धम्माचे आचार-विचारांचे पालन करावे – चंद्रकांत मोहिते

फलटण (विंचुर्णी) दि.२६| “भारत बुद्धमय करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येक बौद्ध उपासक-उपासिकांवर आहे. त्यासाठी धम्माचे काटेकोर पालन करून आचार-विचारांची अंमलबजावणी केली पाहिजे,” असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव आयु. चंद्रकांत मोहिते यांनी केले. ते मौजे विंचूर्णी येथे वर्षावास प्रवचन मालिकेतील दहावे पुष्प गुंफताना बोलत होते.

यावेळी प्रवचनात मोहिते यांनी श्रावण पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी पंचशीलाचे पालन करून नीतिमान जीवन जगण्याचा संदेश दिला. “धम्म हा निर्मळ जीवनाचा मार्ग आहे. अंधश्रद्धा व कर्मकांड टाळून धम्म आचरणात आणल्यासच खरी प्रगती शक्य आहे, अन्यथा विनाश अटळ आहे,” असेही ते म्हणाले.

भारतीय बौद्ध महासभा शाखेचे महासचिव आयु. बाबासाहेब जगताप यांनी वर्षावासाचे महत्व समजावून सांगितले. तसेच कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे, संस्कार विभागाचे सचिव बजरंग गायकवाड, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे, संघटक आयु. विजयकुमार जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. विंचूर्णी गावातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

फलटण तालुक्याचे भूषण, ॲडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स मुंबई आयु. तुषार मोहिते यांच्या संकल्पनेतून ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक उपासक-उपासिकांना वितरित करण्यात आले. तसेच लहान मुलांना संविधान उद्देशिका व वंदना सूत्रपठन पुस्तिका देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहे*

0
फलटणमध्ये वनखात्याच्या जागेतील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीमुळे कायदेशीर व पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतात वनक्षेत्रातील झाडांची तोड वनसंवर्धन कायदा १९८० अंतर्गत नियंत्रित असून, कोणत्याही...

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले

0
पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रुग्णालयात दाखल

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

हिंजवडी आयटी पार्कमधील मान्सूनपूर्व काम पूर्ण करण्यासाठी ३१ मेची अंतिम मुदत

0
पुणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि स्थानिक ग्रामपंचायतींनी हिंजवडी आयटी पार्कमधील सर्व मान्सूनपूर्व देखभाल पूर्ण करण्यासाठी 31...

नियमित VO2 चाचणी रेकॉर्ड-सेटिंग मॅरेथॉनर प्रकट करते

0
विज्ञानाने मार्ग दाखवला. पायांनी ते पार केले. नियमित VO2 कमाल चाचणी — वाढत्या कामाच्या ओझ्याखाली शरीर किती कार्यक्षमतेने ऑक्सिजन वापरते याचे एक...

error: Content is protected !!