Homeताज्या बातम्याभंते काश्यप यांची प्रेरणादायी धम्मदेशना – मौजे पवारवाडी येथे पुण्यानुमोदन कार्यक्रम संपन्न

भंते काश्यप यांची प्रेरणादायी धम्मदेशना – मौजे पवारवाडी येथे पुण्यानुमोदन कार्यक्रम संपन्न

फलटण दि.२१| भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने मौजे पवारवाडी येथे संस्कार सचिव आयुष्यमान अमोल भोसले सर यांच्या वडिलांचे कालकथित बबन दामू भोसले यांच्या पुण्यानुमोदन विधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी भंते भदंत काश्यप यांनी उपस्थितांसमोर प्रेरणादायी धम्मदेशना दिली. त्यांनी “कालकथित” या शब्दाचा सखोल अर्थ स्पष्ट करताना जीवनाच्या क्षणभंगुरतेविषयी विवेचन केले.मानवी जीवन क्षणिक आहे, म्हणूनच ते सदुपयोगी व्हावे. मृत्यू हा शेवट नसून धम्ममार्गाचा खरा आरंभ आहे. पुण्यानुमोदन म्हणजे केवळ स्मृती नसून, आपल्या प्रिय व्यक्तीच्या पुण्यकर्मांची आठवण ठेवून स्वतःचे जीवनही त्याच धम्ममूल्यांनी सुशोभित करणे होय.बौद्ध धम्माचे मूळ तत्त्व म्हणजे करुणा, प्रज्ञा आणि समता – यांचा अंगीकार केल्यासच खऱ्या अर्थाने मानवी जीवन यशस्वी व परिपूर्ण ठरते. त्यांनी साध्या, सोप्या आणि हृदयस्पर्शी शब्दांत सांगितलेल्या या धम्मदेशनेने सर्व उपस्थित श्रोत्यांना अंतर्मुख केले.

या पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे बौद्धाचार्य म्हणून फलटण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आयुष्यमान महावीर भालेराव यांनी पारंपरिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पाडले.हा कार्यक्रम केवळ पारंपरिक पुण्यानुमोदन न ठरता, तो बौद्ध धम्मातील जीवनदृष्टी आणि चिंतन यांचा प्रसार करणारा ठरला. भंते काश्यप यांच्या धम्मदेशनेतून उपस्थितांना – जीवनाच्या क्षणभंगुरतेचे भान, सद्विचार व सदाचार अंगीकारण्याची प्रेरणा, धम्ममार्गाने जगण्याचे महत्त्व, पुण्यकर्माची खरी व्याख्या यांची जाणीव झाली.

मौजे पवारवाडी येथे संपन्न झालेला हा पुण्यानुमोदन कार्यक्रम हे केवळ धार्मिक कृत्य नव्हते, तर तो भंते काश्यप यांच्या प्रभावी धम्मदेशनेतून जीवनाचे सार आणि धम्ममार्गाचे महत्त्व प्रत्येक उपस्थिताच्या अंतःकरणात कोरले गेले.फलटण तालुक्याचे कोषाअध्यक्ष आयुष्यमान विठ्ठल निकाळजे सर, आयुष्यमान सोमीनाथ घोरपडे सर, कार्यालयीन सचिव आयुष्यमान चंद्रकांत मोहिते सर,संघटक आनंद जगताप उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान...

0
डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण...

0
🌺 मातृदेवता : संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाची जिवंत मूर्ती! 🌺 समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या आयुष्याला...

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

error: Content is protected !!