Homeताज्या बातम्याभव्य राज्यस्तरीय ‘छत्रपती कृषी 2025’ प्रदर्शनाची जय्यत तयारी गिनीज बुकमध्ये नोंद असलेली...

भव्य राज्यस्तरीय ‘छत्रपती कृषी 2025’ प्रदर्शनाची जय्यत तयारी गिनीज बुकमध्ये नोंद असलेली ‘राधा’ बुटकी म्हैस विशेष आकर्षण

सातारा – जिल्हा परिषद मैदानावर दिनांक 19 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती कृषी 2025 या भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या तयारीला वेग आला आहे. प्रदर्शनासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य मंडपाच्या कामालाही जोरदार सुरुवात झाली असल्याची माहिती स्मार्ट एक्सपोचे संयोजक सोमनाथ शेटे यांनी दिली.

पाच दिवस चालणार हे प्रदर्शन दररोज सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार आहे. राज्यभरातून हजारो शेतकरी बांधवांची उपस्थिती अपेक्षित असून 200 हून अधिक कृषी कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

प्रदर्शनाची प्रमुख आकर्षणे

गिनीज बुकमध्ये नोंद असलेली जगातील सर्वात बुटकी ‘राधा’ म्हैस (उंची फक्त 2.8 फूट) – विनामूल्य दर्शनाची सुवर्णसंधी

विविध भारतीय कंपन्यांचे ट्रॅक्टर व अत्याधुनिक शेती अवजारे – एका छताखाली

रिमोट ऑपरेटेड ड्रोनचे लाईव्ह प्रात्यक्षिक – 10 मिनिटांत 1 एकर फवारणीची क्षमता

ड्रोन उद्योगासाठी विशेष दालन – उद्योजकतेसाठी माहिती

सेंद्रिय शेती दालन, विविध तंत्रज्ञान दालने, शेती प्रात्यक्षिके

हायड्रोपोनिक्सचे लाईव्ह प्रात्यक्षिक

दुर्मिळ देशी बियाण्यांचे 500+ प्रकार – दर्शन व विक्री

भाजीपाला रोपवाटिका, दुर्मिळ प्रजातींची दालने

परदेशी भाजीपाला प्रदर्शन

कृषीविषयक पुस्तके, तज्ञ मान्यवरांची व्याख्याने

सौर ऊर्जा तंत्रज्ञान दालने

गृहोपयोगी वस्तूंचे भव्य दालन

या सर्व उपक्रमांमुळे ‘छत्रपती कृषी 2025’ हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ज्ञान, तंत्रज्ञान व नवउद्योगाच्या संधींचा मोठा मेळावा ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाची खंडणी केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक

पुणे : आळंदी-पुणे रोडवरील दिघी येथे सापळा रचून खासगी सुरक्षा एजन्सीच्या मालकाकडून तीन लाख रुपये उकळल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने मंगळवारी एका...

साक्षीदार नाही, पण सुगावाचा माग: केतन अग्रवाल खून प्रकरणात पोलिसांनी एकत्र नांगी; पॉलीग्राफ चाचणी,...

रिया गोयल (आर) आणि तिचा कथित प्रियकर, चेतन चौधरी (एल), रिअल्टर केतन अग्रवाल (एम) च्या कथित हत्येप्रकरणी पॉलीग्राफ आणि चाल विश्लेषण चाचण्यांना सामोरे...

ऑनलाइन शेअर फसवणुकीत कात्रज दुकानदाराचे ६४ लाखांचे नुकसान

पुणे : ऑनलाइन शेअर ट्रेडिंगद्वारे जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी कात्रज येथील एका ५३ वर्षीय दुकानदाराची ६३.८५ लाख रुपयांची...

*शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!*

शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!   दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा...

अर्थ मूव्हरने कामगाराला चिरडले, मृतदेह बनावट हिट-अँड-रनमध्ये टाकला | पुणे बातम्या

19 जून रोजी, एक अर्थ मूव्हर कथितरित्या कामगार दुपारी झोपेत असताना त्याच्या अंगावर धावून गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. पुणे : एका कामगाराचा...

error: Content is protected !!