फलटण : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण
यावेळी भारतीय स्टेट बँक फलटण शाखेचे शाखाधिकारी चंद्रकांत जगताप,फलटण शेती शाखेचे शाखाधिकारी योगेश कोरडे,वरीष्ठ लिपिक विष्णुपंत जाधव,मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी इ.पाचवीतील विशाल मंडले,
आदित्य चौगुले,सोनाली भोसले,शौर्य सावंत,सुयश जाधव,श्री अवघडे,आयात सय्यद,वैष्णवी चांडाल पवार,अंजली डोंगरे,दुर्गेश्वरी पवार
कुणाल आवारे,सुशांत पवार,तृप्ती भालेराव,इ.सहावीतील श्रध्दा भोसले या गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय स्टेट बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही सदैव कटिबद्ध आहे.विदयार्थ्यांनो नियमित बचतीची सवय लावा, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि प्रामाणिकपणा,शिस्त व मेहनतीच्या बळावर जीवनात चांगले यश मिळवा असा सल्ला देऊन आजचा हा गणवेश तुमच्या उज्ज्वल भविष्याचा आत्मविश्वास वाढवणारा ठरो अशा शुभेच्छा शाखाधिकारी चंद्रकांत जगताप आणि योगेश कोरडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिल्या.
मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी स्टेट बँकेचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आहे असे सांगून उपस्थित सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि त्यांना धन्यवाद दिले.किशोर पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मानले.


























