Homeताज्या बातम्या*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत...

*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण*

*महात्मा फुले द्विशताब्दी जयंती व अहिल्यादेवी होळकर ३०१ वी जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण*

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

फलटण : सुवर्ण परिस स्पर्श फाउंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण यांच्या पुढाकारातून सातारा जिल्ह्यात प्रथमच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त महिलांसाठी विशेष कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात आला.

महिला व मुलींना आत्मनिर्भर आणि सक्षम बनविण्याच्या उद्देशाने फाउंडेशनतर्फे एक महिन्याचा बेसिक मेहंदी प्रशिक्षण वर्ग तसेच तीन दिवसीय साडी ड्रेपिंग (साडी ड्रेसिंग) प्रशिक्षण वर्ग पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकूण ७८ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी संस्थेच्या वतीने महिलांना केवळ कौशल्य प्रशिक्षणच देण्यात आले नाही, तर त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. ॲड. मयुरी शहा यांनी महिलांसाठी विशेष एक तासाचे व्याख्यान घेत विविध महिला कायदे, हक्क, संरक्षणात्मक तरतुदी तसेच न्याय मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.

यावेळी फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, “स्त्री शिक्षित झाली तर समाज प्रगल्भ होतो आणि स्त्री सक्षम झाली तर राष्ट्र समृद्ध होते,” या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना अनुसरून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

फलटण तालुक्यातील या उपक्रमाला महिलावर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फाउंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण यांनी सांगितले की, महिलांना आत्मनिर्भर व सक्षम बनविणे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आणि माता रमाई यांसारख्या थोर महिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य संस्था करत आहे. केवळ जयंती आणि पुण्यतिथी साजऱ्या करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रांजली ज्योतिबा जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सिद्धी दयानंद कवितके यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तर अमीना सलीम शेख यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या शबाना पठाण या सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा जपत समाजकार्य करत आहेत. या उपक्रमातून अनेक महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या शबाना इनामदार, शीतल भोसले आणि रेश्मा कवितके यांचे फाउंडेशनतर्फे आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान...

0
डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण...

0
🌺 मातृदेवता : संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाची जिवंत मूर्ती! 🌺 समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या आयुष्याला...

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

error: Content is protected !!