माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जिल्हा बँकेचे बिनविरोध संचालक झाल्याच्या प्रित्यर्थ नगरसेवक संदीप चोरमले यांच्याकडून पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करत भव्य आनंदोत्सव साजरा
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण
फलटण – माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जिल्हा बँकेचे बिनविरोध संचालक झाल्याच्या प्रित्यर्थ फलटणमध्ये नगरसेवक संदीप चोरमले यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून व फटाक्यांची आतषबाजी करत भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सातारा जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याची बातमी समजताच कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते
नगरसेवक संदीप चोरमले यांनी पुढाकार घेत या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निवडीचे स्वागत करत त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला.
नगरसेवक संदीप चोरमले यांच्या हस्ते नागरिक आणि कार्यकर्त्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जोरदार फटाक्यांची आतषबाजी करून संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या आनंदोत्सवात परिसरातील नागरिक, स्थानिक पदाधिकारी आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत या विजयाचे स्वागत केले.


























