*मिरगांवच्या वेताळ बाबांची यात्रा होणार उत्साहात साजरी*
फलटण सातारा रस्त्यावरील फलटण पासून दहा की. मी. असणार्या श्री क्षेत्र मिंरगाव येथील श्री वेताळबाबा देवस्थान यात्रोत्सव तर्फे मिरगांव येथे असणाऱ्या श्री वेताळ बाबांची यात्रा बुधवार दि.१८/०३/२०२६ ते शुक्रवार दि. २०/०३/२०२६ अखेर संपन्न होणार असून बुधवार दि. १८/०३/२०२६ रोजी रात्री ८/०० वाजता श्री सद्गुरू वेताळ बाबांची महाआरती होणार असून आरती झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री १०/०० वाजता बारामतीकर यांचा रंगीला आर्केस्टाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि.१९/०३/२०२६ रोजी गुढीपाडवा.
शुक्रवार दि.२०/०३/ २०२६ रोजी रात्री ८/०० वाजता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गंजी नृत्याचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री १२/०० वाजता महाआरती तसेच भाकणूकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . वर्षातून एकदाच महींलांना मंदिरात प्रवेश असतो.तरी या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री हणमंतराव सरक ( आण्णा महाराज ) यांनी केले आहे.


























