मौजे सांगवी, फलटण येथील दुर्गा दौड मधील गुन्ह्याबाबत
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत मौजे सांगवी, ता. फलटण येथे आज दिनांक 20/10/2026 रोजी दुर्गा दौड दरम्यान झालेल्या वादाच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे *गुन्हा रजि. नंबर 616/2026, कलम BNS 299, 118(1)(2), 352, 351(2), 115(2) अन्वये* गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील संशयित महिला आरोपीस *अटक करण्यात आली असून* पुढील तपास करीत आहेत.
तरी सदर घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडिया व इतर माध्यमातून पसरत असलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून कायदेशीर कारवाई सुरू असून कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे.
नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये व पोलीस तपासास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे
*प्रभारी पोलीस अधिकारी*
*फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, जि. सातारा*


























