Homeताज्या बातम्यावेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न फसला : दोन महिलांची सुटका, दोन सराईतांना गजाआड

वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न फसला : दोन महिलांची सुटका, दोन सराईतांना गजाआड

वडगाव निंबाळकर| दि.१७ |  वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी जबरदस्तीने दोन महिलांना नेत असताना वडगाव निंबाळकर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांची सुटका केली. या प्रकरणी दोन सराईतांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडील स्विफ्ट कार (क्र. एमएच ११ एमडी ८०५५) जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी करंजेपूल बस स्टॉप परिसरात करण्यात आली. परिसरात गस्त घालत असताना लाल रंगाची काळ्या काचा असलेली गाडी संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नाकाबंदी करून गाडी थांबवली असता, त्यामध्ये दोन पुरुषांसह दोन महिला आढळून आल्या. महिलांची चौकशी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पैशाचे आमिष दाखवून हडपसर (पुणे) येथून बेकायदेशीर पद्धतीने लोणंद येथे आणण्यात आले होते. आरोपी जबरदस्तीने त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करत होते. याआधीही अशाच प्रकारे लोणंद परिसरात आणून अवैध धंद्यास प्रवृत्त केल्याचे महिलांनी सांगितले.

या प्रकरणी सुयोग हिंदुराव खताळ (रा. कापडगाव, लोणंद ता. फलटण, जि. सातारा) व प्रीतम आप्पासाहेब घुले (रा. कापडगाव, लोणंद ता. फलटण, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार या घटनेत आणखी मोठ्या रॅकेटचा मागोवा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्यासह पोलीस पथकातील इतर जवानांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर...

0
🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सर्पदंश व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत...

शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा...

0
शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध; जुनी पेन्शन, TET सक्ती रद्द आणि १०० टक्के अनुदानासह विविध प्रश्नांवर...

फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

0
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार? फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज...

राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने...

0
राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने धुव्वा; फलटणच्या संघाची स्पर्धेत दणदणीत आगेकूच समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

0
### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती समर्थ 24 तास...

error: Content is protected !!