Homeताज्या बातम्यासैन्य दलात भरती करतो म्हणून लाखो रुपये घेऊन फसवणूक करणारा आर्मी जवान...

सैन्य दलात भरती करतो म्हणून लाखो रुपये घेऊन फसवणूक करणारा आर्मी जवान अटक

सातारा दि. 21 :सैन्य दलात भरती करून देतो असे सांगून तब्बल 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आर्मी जवानाला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीचे नाव प्रदीप विठ्ठल काळे (वय 28, रा. कोळे, ता. कराड, जि. सातारा) असे असून तो दोन महिन्यांपासून नोकरीवर गैरहजर होता.

फिर्यादी रितेश नितीन जाधव (रा. नेले किडगाव, ता. सातारा) यांना तसेच त्यांच्या भावाला आरोपीने आर्मीमध्ये क्लार्क पदावर भरती करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी वेळोवेळी ऑनलाईन तसेच आरटीजीएसद्वारे 3 लाख 70 हजार रुपये घेतले. परंतु, भरतीबाबत कोणतीही कारवाई न करता आरोपीने टाळाटाळ केली व शेवटी फिर्यादीचे नंबरही ब्लॉक केले. त्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी तत्काळ तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद नेवसे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने पुणे येथून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपीने यापूर्वी कराड तालुक्यातील एका युवकाचीही अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे समोर आले असून आणखी काही युवकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा फसवणुकीचे बळी ठरलेल्या युवकांनी तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि विनोद नेवसे, पोहवा संदीप आवळे, मनोज गायकवाड, पंकज ढाणे, विद्या कुंभार, राजू शिखरे, शिवाजी वायदंडे, दादा स्वामी, प्रदीप मोहिते, पोकॉ संदीप पांडव तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान...

0
डॉ. आ. ह. साळुंखे यांना ‘राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक व लेखक पुरस्कार’ प्रदान मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ग. कौ. फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण...

0
🌺 मातृदेवता : संघर्ष, त्याग आणि कर्तृत्वाची जिवंत मूर्ती! 🌺 समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नव्हे, तर आपल्या आयुष्याला...

जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा...

0
जाधववाडी बिरदेव नगर येथील श्री बिरोबा देवाची यात्रा यंदा रद्द; श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय २४, २५ व २६ ऑक्टोबर रोजी यात्रेचे आयोजन होणार...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक ...

0
मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन फलटण...

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात...

0
पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान.   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क .फलटण   शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण...

error: Content is protected !!