फलटण दि.२७| गरिबांच्या न्यायासाठी सातत्याने कार्यरत असलेले ॲड. बापूसाहेब प्रकाश शीलवंत (विशेष सरकारी वकील तसेच भारत सरकार नोटरी वकील) आणि ॲड. अजीम सलीम मेटकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साई हाइट’, फलटण येथे नवीन कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनावेळी बोलताना ॲड. शीलवंत म्हणाले, “गरजू व न्यायापासून वंचित घटकांना मदत करणे हे आमचे ध्येय असून हे नवे कार्यालय जनतेच्या सेवेसाठी खुले राहील.”
कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यालयाच्या माध्यमातून फलटण परिसरातील सर्वसामान्यांना विशेषतः गरजू घटकांना कायदेशीर प्रश्नांबाबत मार्गदर्शन व मदत मिळणार आहे.
या वेळी लोकध्यासचे संपादक राजकुमार काकडे, समर्थ 24तासचे प्रशांत सोनवणे, सहसंपादक गणेश भोईटे, 7 स्टारचे संपादक सुरज तोडकर तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय भोंडवे यांनी उपस्थित राहून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


























