Homeताज्या बातम्याकोरेगाव तालुक्यात बुधवारपासून महसूल सेवा पंधरवडा; गांधी जयंतीपर्यंत विविध समस्या सोडविण्यावर राहणार...

कोरेगाव तालुक्यात बुधवारपासून महसूल सेवा पंधरवडा; गांधी जयंतीपर्यंत विविध समस्या सोडविण्यावर राहणार भर; जनतेला प्रत्यक्ष लाभ देण्याचे प्रयत्न : तहसीलदार डॉ. संगमेश कोडे

कोरेगाव दि.१५| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दि. २ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण कोरेगाव तालुक्यात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी सोमवारी सायंकाळी ४:०० वाजता दिली.

सेवा पंधरवड्याची सुरुवात दि. १७ सप्टेंबर रोजी होणार असून, त्याची पूर्वतयारी म्हणून सर्व गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलिस पाटील, विकास सोसायटीचे सचिव यांच्यासह शिवार फेरी आयोजित करण्यात आली आहे.

भूमी अभिलेख विभागाकडूनही वादग्रस्त रस्त्यांचे सीमांकन करून सर्व रस्ते नकाशात दर्शवून अभिलेखात त्यांची नोंद घेण्यात येणार आहे. याबाबत स्थानिक स्तरावर सर्व लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे. शिवार फेरी दरम्यान विविध रस्त्यांची पाहणी केली जाणार आहे. सोबतच ई-पीक पाहणी व ॲग्रीस्टॅक नोंदणी केली जाणार आहे, असे डॉ. कोडे यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात ता. २२ ते ३० सप्टेंबर दरम्यान सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत ग्रामविकास विभागाने सर्वेक्षण करून अंतिम केलेल्या व नियमाप्रमाणे देय असलेल्या व्यक्तींना जागेचे पट्टे दिले जाणार असून, संबंधितांचे अतिक्रमण नियमानुकूल केले जाणार आहे.

याचा लाभ अनेक बेघर लोकांना होणार आहे. महसूल, ग्रामविकास, कृषी, भूमी अभिलेख, पोलिस विभाग व इतर कार्यालयांच्या सहकायनि मोहीम यशस्वी करणार असल्याचे तहसीलदार डॉ. कोडे यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीकरांनो, पाण्याचा जपून वापर करा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; शहरात दोन दिवस पाणीपुरवठा...

0
बारामतीकरांनो, पाण्याचा जपून वापर करा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण रविवार, १८ ऑक्टोबरला बारामती शहरासह...

फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांकडून माळजाई मंदिरात उत्साहात महाआरती आणि महाप्रसाद

0
फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांकडून माळजाई मंदिरात उत्साहात महाआरती आणि महाप्रसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण नगरपरिषदेच्या सर्व महिला सफाई कामगारांनी श्री माळजाई मंदिर परिसर...

कर्जदारांच्या वेदना कोण समजून घेणार? आर्थिक संकटग्रस्त कुटुंबांना न्यायाची प्रतीक्षा!

0
कायदेशीर हक्क, प्रक्रिया, कागदपत्रांची सत्यता आणि सक्षम प्राधिकरणाचे आदेश यांचे पालन झाले पाहिजेत. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण " लाखो रुपयांच्या कर्जासाठी कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची लूट...

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार...

0
फलटण कृषी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजारात १५१४ पिशव्यांची म्हणजेच...

मुधोजी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन फलटण:

0
मुधोजी महाविद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फ. ए. सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग...

error: Content is protected !!