Homeताज्या बातम्या*संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा* *रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव,...

*संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा* *रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप शिंदे खजिनदार; लायन्स क्लब फलटणची नवी कार्यकारिणी पदस्थ*

संपन्न; नव्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली समाजसेवेची धुरा

रणजित बर्गे अध्यक्ष, प्रमोद निंबाळकर सचिव, तर दिलीप शिंदे खजिनदार; लायन्स क्लब फलटणची नवी कार्यकारिणी पदस्थ

फलटण, प्रतिनिधी : समर्थ 24 न्युज नेटवर्क

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-१, रिजन-२, झोन-१ अंतर्गत लायन्स क्लब फलटण, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम आणि लायन्स क्लब फलटण वेलनेस वॉरियर्स या तीनही क्लबच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा रविवारी फलटण येथील हॉटेल साई रत्न येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या सोहळ्यात माजी प्रांतपाल लायन भोजराज नाईक निंबाळकर (PMJF) यांनी पदग्रहण व शपथविधी अधिकारी म्हणून नवीन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ दिली. तसेच लायन मंगेश दोशी (PMJF) यांनी इंडक्शन ऑफिसर म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ला.राजेंद्र मोहीते.सातारा MIDC, ला.बाळासाहेब शिरकांडे, ला.नरेंद्र रोकडे, ला.अनिल कदम ला.शशिकांत पाटील सातारा युनायटेड क्लब .ला.डाँ.बापूसाहेब सावंत सातारा आजिंक्य.ला.केसकर अध्यक्ष सातारा अजिंक्य.ला.जयंत काटवटे रिजन सेक्रेटरी.ला.महेद्र कदम रिजन चेअरमन रिजन दोन.व लायन क्लब कोल्हापूरचे प्रा.डाँ.ला.सर्जेराव पाटील तसेच जेष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.

यावेळी रिजन चेअरमन लायन नीलम पाटील, झोन चेअरमन लायन जगदीश करवा, रिजन चेअरमन इलेक्ट लायन महेंद्र कदम तसेच झोन चेअरमन इलेक्ट लायन संध्या गायकवाड यांच्यासह लायन्स परिवारातील अनेक पदाधिकारी, सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी लायन्स क्लब फलटणच्या अध्यक्षपदी लायन रणजित बर्गे, सचिवपदी लायन प्रमोद निंबाळकर व खजिनदारपदी लायन दिलीप शिंदे यांनी पदभार स्वीकारला.

लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षपदी लायन ललिता ढवळे, सचिवपदी लायन प्रितम पाटील आणि खजिनदारपदी लायन प्रियंका शिंदे यांनी पदभार स्वीकारला.

तर लायन्स क्लब फलटण वेलनेस वॉरियर्सच्या अध्यक्षपदी लायन राजेंद्र कोठारी, सचिवपदी लायन स्वप्नील शहा आणि खजिनदारपदी लायन पंकज दोशी यांची नियुक्ती करण्यात आली.

नवीन पदाधिकाऱ्यांनी समाजहित, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि विविध सेवाभावी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी लायन्सच्या सेवाकार्याचे कौतुक करत नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन लायन्स क्लब फलटण परिवाराने उत्कृष्टरीत्या केले. पदाधिकाऱ्यांचा सत्कार, शपथविधी आणि समाजसेवेचा संकल्प यामुळे सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

लायन्स क्लब फलटणच्या आजवरच्या समाजोपयोगी कार्याचाही गौरव करण्यात आला. सेवाभावाची परंपरा जपत क्लबच्या माध्यमातून लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल, फरांदवाडी, माळजाई येथील नेत्र तपासणी केंद्र, लायन्स नागरी पतसंस्था, फलटण तसेच लायन्स माळजाई उद्यान यांसारखे कायमस्वरूपी प्रकल्प यशस्वीपणे उभारण्यात आले असून, हजारो नागरिकांना त्याचा लाभ होत आहे. आरोग्य, नेत्रसेवा, आर्थिक सहकार्य आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात लायन्स क्लब फलटणने केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. आगामी काळातही अधिक व्यापक सेवाभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.

“समाजसेवाच आमचे ध्येय” या लायन्सच्या ब्रीदवाक्याला साजेसा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून फलटण तालुक्यात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व सामाजिक सेवांचे उपक्रम अधिक जोमाने राबविले जातील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

दरम्यान निवृत्त होणाऱ्या कार्यकारिणीचा विशेष गौरव करण्यात आला. लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष लायन महेश साळुंखे आणि लायन्स क्लब वेलनेस वॉरियर्सचे अध्यक्ष लायन सिद्धांत दोशी यांनी आपल्या कार्यकाळात आरोग्य, नेत्रसेवा, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन व विविध सेवाभावी कार्यक्रम प्रभावीपणे राबवून समाजात लायन्सची सेवाभावी ओळख अधिक दृढ केली. तसेच लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा लायन ललिता ढवळे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सदस्यांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करत सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा सोपविली. त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नीलम देशमुख व सुहास निकम यांनी केले तर आभार लायन्सचे नूतन सचिव प्रमोद निंबाळकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीकरांनो, पाण्याचा जपून वापर करा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; शहरात दोन दिवस पाणीपुरवठा...

0
बारामतीकरांनो, पाण्याचा जपून वापर करा! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण रविवार, १८ ऑक्टोबरला बारामती शहरासह...

फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांकडून माळजाई मंदिरात उत्साहात महाआरती आणि महाप्रसाद

0
फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार महिलांकडून माळजाई मंदिरात उत्साहात महाआरती आणि महाप्रसाद समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण नगरपरिषदेच्या सर्व महिला सफाई कामगारांनी श्री माळजाई मंदिर परिसर...

कर्जदारांच्या वेदना कोण समजून घेणार? आर्थिक संकटग्रस्त कुटुंबांना न्यायाची प्रतीक्षा!

0
कायदेशीर हक्क, प्रक्रिया, कागदपत्रांची सत्यता आणि सक्षम प्राधिकरणाचे आदेश यांचे पालन झाले पाहिजेत. समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण " लाखो रुपयांच्या कर्जासाठी कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेची लूट...

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार...

0
फलटण कृषी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजारात १५१४ पिशव्यांची म्हणजेच...

मुधोजी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन फलटण:

0
मुधोजी महाविद्यालयात 'वाचन प्रेरणा दिन' निमित्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फ. ए. सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग...

error: Content is protected !!