Homeताज्या बातम्याकष्ट, जिद्द आणि घामातून घडलेले सुवर्णयश

कष्ट, जिद्द आणि घामातून घडलेले सुवर्णयश

शिवम वडार ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ श्री २०२५–२६’चा मानकरी

पुणे दि.१४| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित आंतर विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावत वाघिरे महाविद्यालय, सासवडचा शिवम वडार याने ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ श्री २०२५–२६’ या मानाच्या किताबावर आपले नाव कोरले. ही भव्य स्पर्धा १० डिसेंबर रोजी सी. डी. जैन महाविद्यालय, श्रीरामपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

एकूण आठ वजनी गटांत झालेल्या या चुरशीच्या स्पर्धेत ७५ किलो वजन गटात शिवम वडार याने नगर विभाग, नाशिक विभाग व पुणे शहर विभागातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली. त्याचप्रमाणे ६५ किलो वजन गटात पांडुरंग भोसले याने निर्विवाद वर्चस्व राखत सुवर्णपदक पटकावले.

सर्व वजनी गटांतील सुवर्णपदक विजेत्यांमधून सर्वोत्तम शरीरसौष्ठवपटूची निवड करण्यात आली आणि आपल्या दिमाखदार शरीरयष्टी, ताकदवान पोझेस व सादरीकरणातील आत्मविश्वासाच्या जोरावर शिवम वडार याने ‘विद्यापीठ श्री’ किताब मिळवला. त्याच्या प्रत्येक पोझला प्रेक्षकांकडून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट मिळाला, तर परीक्षकांनीही त्याच्या मेहनतीची मनापासून प्रशंसा केली. विद्यापीठाचा ‘बेस्ट पोजर’ किताब पांडुरंग भोसले याने पटकावला.

या घवघवीत यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अ‍ॅड. संदीप कदम, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, क्रीडा अधिकारी श्याम भोसले तसेच प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. या यशामागे प्रशिक्षक विशाल देवकर आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

पहाटे गाड्या धुण्यापासून ‘विद्यापीठ श्री’पर्यंतचा संघर्षमय प्रवास

कोलवडी ह्या गावात राहणारा शिवम वडार हा केवळ विजेता खेळाडू नाही, तर संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. तो दररोज पहाटे तीन वाजता उठून सोसायटीतील गाड्या धुण्याचे काम करतो. सकाळी दहा वाजेपर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर तो उर्वरित दिवस कठोर सराव व आहार नियोजनात घालवतो. मागासवर्गीय वडार समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या शिवमने या अतिशय खर्चिक खेळात आजवर अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले आहे.

मात्र, इतके यश मिळवूनही हा गुणी खेळाडू आजही आर्थिक सहाय्यापासून वंचित आहे. त्याचा हा संघर्ष आणि यशकथा केवळ क्रीडाक्षेत्रालाच नव्हे, तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

9 दिवसांच्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील मान्सूनची तूट पुसली; पुणे, मुंबई सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये |...

पुण्यातील जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानंतर अधिकाऱ्यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर पाण्याचा साचलेला परिसर दाखविणारे विहंगम दृश्य पुणे : जून महिना संपल्यानंतर अवघ्या...

बीएलओ ड्युटीवरून महा शिक्षकांनी आज राज्यव्यापी शाळा बंद

शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये म्हणून शिक्षकांना केवळ शैक्षणिक जबाबदाऱ्या सोपवल्या जाव्यात अशी संघटनांची इच्छा आहे. पुणे : प्राथमिक शिक्षकांना बूथ-लेव्हल ऑफिसर (बीएलओ)...

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही, विरोधाचा इशारा

एमपीसीसी प्रमुख हर्षवर्धन सपकाळ पुणे : एमव्हीए सदस्य आणि शेतकरी कार्यकर्त्यांनी शेततळ्यांच्या दुर्दशेवर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत दिरंगाई करून...

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; पाणी साचले, वाहतूक कोंडी शहर ठप्प; पूरग्रस्त भागातून ४९२ कुटुंबांचे...

मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) मान्सूनपूर्व तयारीमधील उणिवा उघड करत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वाहतूक...

वायू आणि जलप्रदूषणावर एमपीसीबीने बारामती ॲग्रोला पाठवली नोटीस | पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

error: Content is protected !!