Homeताज्या बातम्या*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच दोन ग्रामसेवक व दोन...

*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू*

ब्रेकिंग न्यूज
आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्यावाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या‘2 महिला सहकाऱ्यांनी अनुकूल काम नाकारले, तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले’: पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी मृत्यूच्या चिठ्ठीत काय लिहिले*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू**दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी सुरू**फलटणच्या सह दुय्यम निबंधकांवर शासनाची मोठी कारवाई; १,५४५ दस्तांच्या संशयास्पद नोंदणीप्रकरणी सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित**फलटण, प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण-कोरेगाव व माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक शिवसैनिकांच्या मुलाखतींचे आयोजन रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी फलटण येथे अनंत मंगल कार्यालय कोळकी येथे करण्यात आले आहे.*क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते*केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढविण्याचे धोरण स्वीकारले असून देशात ई-२० नंतर आता ई-२२ ते ई-३० पर्यंतच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी मानके अधिसूचित करण्यात आली आहेत*. *E30 म्हणजे पेट्रोलमध्ये ३० टक्के इथेनॉल मिश्रण असलेले इंधन होय. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने यासंदर्भातील मानके जाहीर केली आहेत*.मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तब्बल ५ तास वाहतूक कोंडी

दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण

फलटण, प्रतिनिधी : दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, तत्कालीन सरपंच, संबंधित ग्रामसेवक तसेच शिपाई यांच्याविरोधात चौकशी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तक्रारदार तानाजी कोलवडकर यांनी दिली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

तक्रारीनुसार, सन २०१९ ते जून २०२५ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर विविध करांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे जमा झालेली रक्कम अधिकृत नोंदींमध्ये अथवा ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा करण्यात आली नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

याशिवाय, कर वसुलीसाठी कथितपणे डुप्लिकेट पावती पुस्तकांचा वापर करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विविध विकासकामांच्या अंमलबजावणीत आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, अनेक ग्रामस्थांकडे संबंधित पावत्या उपलब्ध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांतील सर्व आर्थिक व्यवहार, बँक खाते नोंदी, पावती पुस्तके, खर्चाची कागदपत्रे तसेच विकासकामांशी संबंधित अभिलेख यांची स्वतंत्र समितीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीत आणखी काही गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला असून, ग्रामपंचायतीतील काही कर्मचाऱ्यांनी कथितपणे आर्थिक रक्कम स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच शासनाच्या निधीचा अपहार झाला असल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाला झालेल्या कथित आर्थिक नुकसानीची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, काही कर्मचाऱ्यांनी तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने आधारकार्डातील जन्मतारखांमध्ये बदल करून सेवा मुदत वाढवून घेतल्याचा गंभीर आरोपही तक्रारदारांनी केला आहे. निवृत्तीची वेळ उलटून गेल्यानंतरही शासकीय अनुदानाचा लाभ घेत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात संबंधितांविरोधात गुन्हे दाखल होणे अपेक्षित असताना काही अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणावे व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

तक्रारदार तानाजी कोलवडकर यांनी इशारा देताना सांगितले की, या प्रकरणातील चौकशीला गती देऊन आठ दिवसांच्या आत आवश्यक ती कारवाई करण्यात आली नाही, तर ग्रामस्थांच्या सहभागाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे दालवडी ग्रामपंचायतीतील या कथित गैरव्यवहार प्रकरणाकडे आता तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

‘2 महिला सहकाऱ्यांनी अनुकूल काम नाकारले, तज्ञांच्या बाहेर प्रकल्प नियुक्त केले’: पुणे टीसीएस तंत्रज्ञांनी...

पुणे: एका 48 वर्षीय TCS कर्मचाऱ्याचा, ज्याचा या महिन्याच्या सुरुवातीला आत्महत्येने मृत्यू झाला होता, त्याने तीन लोकांवर - दोन महिला सहकाऱ्यांसह -...

*दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; तत्कालीन सरपंच दोन ग्रामसेवक व दोन शिपायांविरोधात चौकशी...

दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण, प्रतिनिधी : दालवडी ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक...

*फलटणच्या सह दुय्यम निबंधकांवर शासनाची मोठी कारवाई; १,५४५ दस्तांच्या संशयास्पद नोंदणीप्रकरणी सह दुय्यम निबंधक...

फलटणच्या सह दुय्यम निबंधकांवर शासनाची मोठी कारवाई; १,५४५ दस्तांच्या संशयास्पद नोंदणीप्रकरणी सह दुय्यम निबंधक दिपक पवार निलंबित   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण   फलटण | दि....

error: Content is protected !!