Homeताज्या बातम्यादुचाकी वाहनांसाठी एम एच ५३ डी नवीन मालिका सुरु

दुचाकी वाहनांसाठी एम एच ५३ डी नवीन मालिका सुरु

सातारा दि.३ : सातारा जिल्हयात दुचाकी वाहनांसाठी दिनांक 6 ऑक्टोंबर पासुन एम एच ५३ डी 0001 ते 9999 ही नवी मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना आपल्या वाहनास आकर्षक क्रमांक घ्यायचे आहेत त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधुन आपले आकर्षक क्रमांक फी भरुन आरक्षित करुन ठेवावेत. तसेच दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फलटण संदिप म्हेत्रे यांनी कळविले आहे.

पंसतीचा नोंदणी क्रमांक देण्याकरीता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार नोंदणी क्रमांक काटेकोरपणे नेमून देण्यात येईल. अर्जासोबत विहित पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकीत प्रत सादर करणे आवश्यक राहील. अर्जदाराने त्याचे स्वत:चे ओळखपत्र उदा. आधारकार्ड, निवडणूक आयोग ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड यांची सांक्षाकित प्रत तसेच वाहनचालकाचा वैध ई-मेल आयडी, वैध मोबाईल नंबर, पिन कोड नंबर देणे बंधनकारक राहिल. 6 ऑक्टोबरपर्यंत जे वाहनधारक वाहनासाठी तिप्पट फी भरुन दुचाकी वाहन मालिकेतील वाहन क्रमांक घेण्यास इच्छुक आहेत त्यांचे चारचाकी वाहनांचे एल एम व्हि अर्ज सकाळी 10 ते 2 दोन वाजेपर्यंत धनाकर्षासह स्विकारले जातील. ज्या आकर्षक क्रमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला असेल त्यास त्याच दिवशी आकर्षक क्रमांक देण्यात येईल. मात्र एकापेक्षा जास्त अर्जदारांनी पसंतीच्या नोंदणीक्रमांकासाठी अर्ज केला असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावा. जो अर्जदार जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी आकर्षक क्रमांकासाठी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत धनाकर्षासह अर्ज स्विकारले जातील. मात्र एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास अर्जदारांनी कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेचे धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करावा. सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्यास आकर्षक क्रमांक देण्यात येईल. उर्वरित अर्जदारांना धनाकर्ष त्वरीत परत देण्यात येईल. आकर्षक क्रमांक आरक्षित केल्यानंतर १८० दिवसाच्या आत वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फलटण संदिप म्हेत्रे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गोखळी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश तानाजी गावडे पाटील यांची निवड.

0
गोखळी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश तानाजी गावडे पाटील यांची निवड. प्रतिनिधी. सुमित काळे फलटण पूर्व भागातील शंभर वर्ष परंपरा असलेली सहकारातील गोखळी विविध कार्यकारी...

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार; श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या फलटण फेस्टिव्हल २०२६ चा...

0
शहराचा पुसट झालेला सांस्कृतिक वारसा गडद करण्याचे काम फलटण फेस्टिव्हलच्या माध्यमातून सुरू! माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गौरवोद्गार; श्री सद्गुरू प्रतिष्ठानच्या फलटण फेस्टिव्हल २०२६...

कोळकीतील खासगी क्लासमध्ये पाचवीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण! शिक्षिकेसह नववी-दहावीतील काही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल;...

0
कोळकीतील खासगी क्लासमध्ये पाचवीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण! शिक्षिकेसह नववी-दहावीतील काही विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; दहा वर्षीय मुलाच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे वन समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण,...

मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा.

0
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात भोंडल्याचा उत्साहात उत्सव साजरा समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी भोंडल्याचा उत्सव मोठ्या उत्साहात...

सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई...

0
सांगवीतील घटनेचा फलटण तालुका मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ग्रामीण पोलिसांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी फलटण, प्रतिनिधी : सांगवी येथे...

error: Content is protected !!