Homeताज्या बातम्या*धुळदेव च्या कन्येची महाराष्ट्र पोलीस दलात दमदार भरारी*

*धुळदेव च्या कन्येची महाराष्ट्र पोलीस दलात दमदार भरारी*

धुळदेवच्या कन्येची महाराष्ट्र पोलिस दलात दमदार भरारी

समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण

ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेल्या धुळदेव गावची सुकन्या मा. सौ. सायली विशाल शिंदे यांची नुकतीच Maharashtra Police मध्ये रत्नागिरी येथे निवड झाल्याचे जाहीर झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी संघर्ष, अथक मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

सौ. सायली शिंदे यांना कै. ज्योतीराम माणिकराव शिंदे यांचे आशीर्वाद तसेच धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मा. श्री विशाल ज्योतीराम शिंदे यांचे भक्कम पाठबळ लाभले. कठीण परिस्थितीतही न डगमगता त्यांनी सातत्याने परिश्रम घेत आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली आणि अखेर महाराष्ट्र पोलिस दलात निवड होण्याचा मान मिळवला. त्यांच्या या यशामुळे समाजाच्या सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

त्यांच्या निवडीबद्दल फलटण पंचायत समितीचे सदस्य तथा अध्यक्ष मा. श्री सचिनराव अभंग, धुळदेव गावचे माजी सरपंच मा. श्री चंद्रकांत जाधव, मा. श्री सुभाषराव शिंदे, विडणीचे माजी सरपंच शरदराव कोल्हे, धुळदेव विकास सोसायटीचे माजी चेअरमन श्री बापूराव नाळे, ग्रामपंचायत सदस्य श्री महामुनी, सामाजिक कार्यकर्ते श्री अनिकेत पवार, श्री रवीभाऊ मदने, श्री सौरभ आदलिंगे तसेच ग्रामस्थ, पदाधिकारी आणि महिला भगिनी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील युवक-युवतींनी मोठी स्वप्ने पाहून जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश मिळवावे, असा प्रेरणादायी संदेश सौ. सायली शिंदे यांच्या यशातून मिळत आहे. त्यांचे हे यश निश्चितच धुळदेव गावासाठी अभिमानास्पद ठरत असून संपूर्ण फलटण तालुक्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सेनेत फूट पडल्याने राष्ट्रवादीचे पाच ते सहा खासदार चिंताग्रस्त, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण पुणे : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की,...

इंटरसिटी गाड्या रद्द, मंत्र्यांनी दररोज 200 अतिरिक्त पुणे-मुंबई MSRTC बस फेऱ्यांची घोषणा केली

पुणे ते मुंबई दरम्यान 200 अतिरिक्त ट्रिपसाठी मानक MSRTC बसेस वापरल्या जातील पुणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी संध्याकाळी सांगितले...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR | पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रियेला गती देण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात | पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

error: Content is protected !!