Homeताज्या बातम्यानिंबळक गावातील शाळांच्या विकासासाठी उद्योजक राम निंबाळकरांचा मदतीचा हात

निंबळक गावातील शाळांच्या विकासासाठी उद्योजक राम निंबाळकरांचा मदतीचा हात

जि. प. शाळा, न्यू इंग्लिश माध्यमिक स्कूलला भेट; भौतिक सुविधांसह रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावणार

फलटण, दि. १७ : निंबळक गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक श्री. राम निंबाळकर यांनी गावातील जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश माध्यमिक स्कूलला सदिच्छा भेट देऊन शाळांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रथम त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळा समिती सदस्य, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वर्गखोल्यांची पाहणी करून आवश्यक भौतिक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. परिसर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठीही त्यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर न्यू इंग्लिश स्कूलला भेट देऊन त्यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली. शाळेतील रिक्त पदांचा प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, तात्पुरते अध्यापन करणाऱ्या शिक्षक श्री. गंगावणे यांचे मानधन पालकांकडून न घेता, स्वतः देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.

“गावातील शाळा उच्च दर्जाच्या असाव्यात, चांगल्या शाळांमधूनच सुसंस्कारित व सुजाण नागरिक घडतात. त्यासाठी लागणारी सर्व मदत केली जाईल,” असे आश्वासन श्री. निंबाळकर यांनी यावेळी दिले. तसेच, सेवानिवृत्त शिक्षक श्री. चंद्रकांत निंबाळकर व सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. राजाराम भोसले यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

या कार्यक्रमास श्री. संजय कापसे, श्री. काशिराम मोरे, श्री. जयराम मोरे, श्री. शिवाजी पिसाळ, श्री. अमोल निंबाळकर, श्री. श्रीकांत निंबाळकर, श्री. विकास भोसले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. वैभव निंबाळकर व अन्य सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर...

0
🐍 सापांना मारू नका, निसर्गाचा समतोल राखा! प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठीही जिंतीकरांना साद नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; सर्पदंश व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत...

शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा...

0
शिक्षकांच्या हक्कांसाठी प्रा. डॉ. वैशाली शिंदे निवडणूक रिंगणात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जाहीरनामा प्रसिद्ध; जुनी पेन्शन, TET सक्ती रद्द आणि १०० टक्के अनुदानासह विविध प्रश्नांवर...

फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन

0
राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू होणार? फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचा संकल्प करावा; नगरसेविका सिद्धाली शहा यांचे आवाहन समर्थ 24 तास न्यूज...

राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने...

0
राष्ट्रीय नेहरू चषक हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूलची विजयी सलामी! दिल्लीच्या संघाचा ५-० गोलने धुव्वा; फलटणच्या संघाची स्पर्धेत दणदणीत आगेकूच समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण फलटण, प्रतिनिधी...

*छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा*

0
### छत्रपती शिवाजी पार्कवरील आंदोलनात दोन्ही ठाकरे परिवारांचा सहभाग; शिवसेना-मनसेचा पाठिंबा मुंबईतील आंदोलन तीव्र करण्याचा दोन्ही पक्षप्रमुखांचा इशारा; महाराष्ट्र सैनिकांसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती समर्थ 24 तास...

error: Content is protected !!