Homeताज्या बातम्या*प्रा विकास शिंदे समाजाभिमुख निर्भिड पत्रकार ,लेखक कवी ,चळवळींचा मार्गदर्शक*

*प्रा विकास शिंदे समाजाभिमुख निर्भिड पत्रकार ,लेखक कवी ,चळवळींचा मार्गदर्शक*

*प्रा विकास शिंदे समाजाभिमुख निर्भिड पत्रकार ,लेखक कवी ,चळवळींचा मार्गदर्शक*

विकास शिंदे यांची जडण घडण मुळात सामाजिक कार्य करणाऱ्या जेष्ठ साहित्यीक सुरेश शिंदे व साखरशाळा प्रकल्पाच्या जन्मदात्या लेखिका सुलेखा शिंदे यांच्या संस्कारात झाली चळवळी ,संघर्ष आंदोलन लहान पणापासून त्यांनी पाहिली आहेत अन्याया विरुद्ध बंड करून लढणारा एक समाजाभिमुख निर्भिड पत्रकार म्हणून प्रा विकास शिंदे यांची ओळख सातारा जिल्ह्यात आहे

प्रा विकास शिंदे यांचे संपूर्ण शिक्षण फलटण मध्येच झाले यशवंतराव चव्हाण हायस्कुल मधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर मराठी विषयातून त्यांनी पदवी घेतली मराठी विषयातच एम ए करून त्यांनी पुढे शिक्षणशास्त्र विषयातून बीएड व एम एड केले पत्रकारितेची आवड त्यांना लहान पणा पासूनच आहे अगदी चवथी पाचवीच्या वयात त्यांनी दैनिक शिवसंदेश साठी लेखन केले कॉ हरिभाऊ निंबाळकर यांनी विकास शिंदे यांचे कौतुक तर केलेच परंतू शिवसंदेश मधून एक व्यासपीठ सुद्धा दिले

सणबुर ता पाटण येथील महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय व ज्यू कॉलेज मध्ये अध्यापनाचे कामही त्यांनी काही वर्षे केले जेष्ठ शिक्षण तज्ञ व मराठी भाषेच्या अभ्यासक डॉ मॅक्सिन बर्नसन यांच्या सोबत फलटण तालुक्यातील प्राथमिक शाळांवर वाचन लेखन प्रकल्प व इंग्रजी सुधार प्रकल्पावर काम केले या काळात डॉ मॅक्सिन बर्नसन यांचे प्रा विकास शिंदे यांना अनमोल मार्गदर्शन मिळाले

पत्रकारितेत आवड असल्याने प्रा विकास शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विषयात पदवी संपादन केली प्रा विकास शिंदे यानी गेली पंधरा वर्षे पत्रकारितेत विविध नियतकालिकांसाठी व दैनिकांसाठी लेखन केले साप्ताहिक लोकजगर , साप्ताहिक विचार संगम, फलटण अंजन , दैनिक शिवसंदेश ,दैनिक स्थैर्य ,एकतादर्शन यासाठी लेखन केले शिवसंदेशकार कॉ हरिभाऊ निंबाळकर यांनी बालवयातच प्रा विकास शिंदे यांना शिवसंदेश चे व्यासपीठ खुले केले होते प्रा विकास शिंदे यांना जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ , स्व दिलीप रुद्रभटे, स्व प्रा रमेश आढाव , दिलीपसिंह भोसले , बबनराव क्षिरसागर यांचे मार्गदर्शन मिळाले मागील तीन वर्षांपासून ते लोकमत फलटणचे प्रतिनिधी म्हणून काम पहात आहेत त्यांच्या बदल घडवणाऱ्या बातम्या नेहमीच समाजाभिमुख राहिल्या आहेत

प्रा विकास शिंदे यांना लहान वयातच जेष्ठ समीक्षक व विचारवंत ग प्र प्रधान यांचे मार्गदर्शन व सहवास मिळाला हडपसर येथील सानेगुरुजी हॉस्पिटल मध्ये ग प्र प्रधान सर वास्तव्यास होते या काळात प्रा विकास शिंदे यांचे लेखन गुण बघून त्यांनी प्रा विकास यांना वाचलेल्या पुस्तकांच्या समीक्षा लिही असे सांगितले यातूनच विकास शिंदे यांची ज्ञानबोध हे समीक्षात्मक पुस्तक तयार झाले ते अल्पावधीतच लोकप्रिय ही झाले

यापूर्वी वाळूचे घर हा त्यांचा बाल कविता संग्रह संस्कार भारती फलटण ने प्रकाशित केला आहे प्रा विकास शिंदे यांनी शिक्षण या विषयावर पहिल्या बाकावरची मुलं ही दीर्घ कादंबरी लिहिली असून लवकरच ती प्रकाशित होईल साखरशाळे तील मुलांचा शैक्षणिक अभ्यास या विषयावर त्यांनी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाकडे शोध निबंध सादर केला आहे फलटण येथील साहित्य परिषदेचे ते सदस्य असून फलटणला साहित्य सवांद नावाची साहित्यिक विचारांचे देवाण घेवाण करणारे एक व्यासपीठ त्यांनी तयार केले असून प्रा ताराचंद्र आवळे रानकवी राहुल निकम यांची ही या साहित्य संवाद मध्ये मोलाची साथ आहे

फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा साहित्यिक पत्रकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते फलटण मधील चळवळींचा मार्गदर्शक चेहरा म्हणून त्यांच्या कडे पाहिले जाते ते स्वतः राजकारणात सक्रिय नसले तरी राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे कारण समाजाभिमुख पत्रकारिते बरोबरच सामाजिक एकता व बंधुता ठेवण्यावर त्यांचा भर असतो जात , धर्म पंथ या पलीकडे माणसाला माणूस म्हणून जगून द्यावं हा त्यांचा विचार असल्याने सर्वच जाती धर्मातील लोक त्यांचे मित्र आहेत

भारतीय पत्रकार संघाचे ते सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत परंतू नवं पत्रकारांसाठी ते नेहमीच मार्गदर्शक ठरले आहेत पत्रकारिता ही सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी वापरावी समाजाचा आरसा म्हणून त्याच्याकडे पहावे लोकशाही मजबूत करण्यासाठी पत्रकारांनी लिहावे सार्वभौम , समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही बळकटी करणासाठी ते लिहीत असतात

सहसंपादक
हिंदुराव गायकवाड
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
फलटण

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात मुसळधार पावसात इमारत कोसळून १६ जण अडकल्याची भीती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी (WTE) प्लांटमधील मोशी येथील तीन मजली प्रशासकीय इमारत बुधवारी मुसळधार पावसात कोसळलीImage Credit: TNN पुणे : पिंपरी चिंचवड...

*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सन्मान**

*श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सन्मान* फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत निर्मला देवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण या शाळेतील विद्यार्थी *अर्णव...

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी घेतली भाजप नेते विनोद तावडे यांची भेट

जयंत पाटील (एल) आणि विनोद तावडे (नि.) यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएमध्ये सामील होण्याच्या अटकळांना तोंड फुटले. पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष...

*भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन...

फलटण : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप...

*खामगाव हादरले! एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू*

खामगाव हादरले! एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण फलटण, दि. ८ : फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी...

error: Content is protected !!