Homeताज्या बातम्या*फलटण मध्ये गॅस वितरणात मोठा घोळ ग्राहक त्रस्त पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह*

*फलटण मध्ये गॅस वितरणात मोठा घोळ ग्राहक त्रस्त पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह*

फलटणमध्ये गॅस वितरणात मोठा घोळ? ग्राहक त्रस्त, पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह

फलटण तालुक्यात गॅस सिलेंडर वितरणात मोठा घोळ उघडकीस येत असल्याचे चित्र समोर येत आहे. ग्राहकांनी बुकिंग केलेले सिलेंडर प्रत्यक्षात मिळत नसताना “डिलिव्हरी पूर्ण” झाल्याचे संदेश मोबाईलवर येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा असताना, त्याचा फटका फलटणलाही बसत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या परिस्थितीत स्थानिक पुरवठा विभाग गॅस वितरणात पारदर्शकता राखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

ग्राहकांचा गंभीर आरोप असा आहे की, बुकिंग केलेले सिलेंडर काही ठिकाणी चढ्या दराने विकले जात आहेत. अधिकृत ग्राहकांना सिलेंडर मिळत नसताना काळाबाजार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पुरवठा विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“बुकिंग केलेले सिलेंडर आम्हाला मिळत नाहीत, पण डिलिव्हरी झाल्याचा मेसेज येतो. मग हे सिलेंडर जातात कुठे?” असा सवाल संतप्त ग्राहक विचारत आहेत. जर ग्राहकांना सिलेंडर मिळालेच नाहीत, तर ते नेमके कोणाला दिले जात आहेत, याची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागात परिस्थिती अधिकच बिकट असून, अनेक कुटुंबांना गॅस न मिळाल्यामुळे पुन्हा चुलीवर पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करावा लागत आहे.

आदरकी (ता. फलटण) येथील रहिवासी अजितकुमार जाधव यांनी सांगितले की,

“मी बुक केलेला सिलेंडर मला मिळालाच नाही, पण तो डिलिव्हर झाला असा मेसेज आला. गॅस कंपनीकडे विचारणा केली असता त्यांनी ‘सिलेंडर मिळाला आहे’ असेच सांगितले. आम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.”

या सर्व प्रकारामुळे फलटण तालुक्यातील गॅस वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शहरात पावसाची संततधार, घाट भागात जोरदार पाऊस

रविवारी झालेल्या पावसामुळे पुण्यातील कर्वे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती पुणे : शनिवार ते रविवार सकाळी 8.30 या 24 तासांत पुणे...

पाईपलाईन चाचणीत मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल

पुणे : पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे नव्याने बांधलेला रस्ता महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळ्यात पाईपलाईनच्या दाब चाचणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने खराब झाला आहे.घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये...

*ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील* *कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार,...

फलटण | प्रतिनिधी समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क फलटण ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह, तहसील कार्यालयाशेजारी, फलटण येथे रविवार, दि. ०५ जुलै...

*सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या...

प्रतिनिधी, दि. ५ : समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण सकल नाभिक समाजाची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असलेल्या किल्ले प्रतापगडावरील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकास अखेर...

’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालच्या काकांनी रियाल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना दिलेला धक्का...

देवीचंद अग्रवाल (सी) यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलताना कुलदीप अग्रवाल (एल) म्हणाले की, 17 दिवसांच्या कालावधीत केतन आणि त्याचे आजोबा या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त...

error: Content is protected !!