बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सेंटर फलटणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात स्वागत करण्यात आले.
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क. फलटण
गेली वीस वर्षे अखंडपणे सुरु असलेली असोसिएशनची परंपरा यंदाही जपण्यात आली. पालखी सोहळ्याबरोबर पायी चालत येणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी असोसिएशनच्या वतीने अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये वारकऱ्यांना शेंगदाणा चिक्की, राजगिऱ्याचे लाडू, साबुदाणा खिचडी, पोहे अशा विविध उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमचे खरे पुण्य असल्याची भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यंदाच्या स्वागत सोहळ्यासाठी असोसिएशनचे चेअरमन सुनील सस्ते, उपाध्यक्ष सागर शहा, महाराष्ट्र राज्य बिल्डर्स असोसिएशनचे सचिव श्री.राम मराठे साहेब,अक्षय तरटे,सुहास सस्ते, विकास म्हेत्रे, संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद निंबाळकर, दिलीपराव शिंदे, किरण दंडीले, महेंद्र जाधव, राजीव नाईक निंबाळकर, महेशशेठ गरवालिया, रणधीर भोईटे, बापू जगताप, विजय जाधव, राहुल नलावडे, लालासाहेब लकडे, राजेंद्र निंबाळकर, अशोक खलाटे, जावीद तांबोळी, अनिल शिपकुले, दत्तात्रय बोबडे, नितीन बोबडे यांच्यासह बांधकाम व्यवसायाशी निगडीत सर्व कामगार वर्ग मोठ्या उत्साहात उपस्थित होता.
पालखीचे आगमन होताच ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. वारकऱ्यांनीही बिल्डर्स असोसिएशनच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत असोसिएशनने 20 वर्षे हा उपक्रम अविरत सुरु ठेवल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


























