Homeताज्या बातम्या*भगवान महावीर जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात...

*भगवान महावीर जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

महावीर जयंतीनिमित्त फलटणमध्ये उत्साहपूर्ण कार्यक्रम; आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिवादन

फलटण :

भगवान महावीर जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याच औचित्य साधून फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील तसेच फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी येथील महावीर स्तंभास भेट देत भगवान महावीरांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी जैन समाज बांधव, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष नाईक निंबाळकर यांनी महावीर स्तंभावर पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले व उपस्थितांना महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर असून त्यांचा जन्म इ.स.पू. ५९९ मध्ये वैशाली येथे झाला. त्यांनी राजवैभवाचा त्याग करून कठोर तपश्चर्या केली आणि सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य व अस्तेय या पंचमहाव्रतांचा संदेश दिला. “जगा आणि जगू द्या” हा त्यांचा महान संदेश आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा मानला जातो.

भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश समाजासाठी मार्गदर्शक ठरत असून, अशा जयंती उत्सवांमुळे त्यांच्या विचारांचा प्रसार होण्यास मोठी मदत होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘लग्न जे कधीच होणार नाही’: सिया गोयलचा मित्राला ‘स्नॅपचॅट मेसेज’ व्हायरल झाला

सिया गोयलचा समावेश असलेल्या स्नॅपचॅट संभाषणाचा कथित स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तिला न्यायालयीन कोठडीत...

‘लग्नाचे 4 महिन्यांचे नियोजन’: सिया गोयलचा मंगेतर केतन अग्रवालचा जुना व्हिडिओ पुन्हा समोर आला

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांचा मृत्यूच्या काही दिवस आधी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पुन्हा ऑनलाइन व्हायरल झाला आहे. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल, त्याच्या...

*राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश*

*राष्ट्रीय पिंच्याक सिलट स्पर्धेत योद्धा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश*   समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क   नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या योद्धा...

पावसात झाडांना टँकरने पाणी दिल्याने संताप

नागरिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली असून, पाण्याचा असा अपव्यय तातडीने थांबवावा. पुणे : शुक्रवारी मुसळधार पाऊस...

पुण्यात विदेशी भाज्यांचे दर वाढल्याने निरोगी खाण्याला प्रीमियम मिळतो

उशीर झालेला मान्सून आणि अनियमित पावसामुळे पिकांचे चक्र विस्कळीत झाले आहे आणि उत्पादनात घट झाली आहे ज्यामुळे विदेशी भाज्यांचे दर वाढले आहेत. पुणे...

error: Content is protected !!