सातारा दि. 16: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत पैलवान कै मारूती चव्हाण – वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, (उपकंपनी) तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ मुख्य कंपनी सातारा या कार्यालयामार्फत बीज भांडवल कर्ज योजना, १ लाख थेट कर्ज योजना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक के.एम. गिऱ्हे यांनी केले आहे.
सन २०२५- २०२६ या आर्थिक वर्षाचे उदिष्ट प्राप्त झाले असून, व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहिल. तथापि कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास कमाल १२ टक्क्यापर्यंत व्याज महामंडळ लाभार्थीचा बँक खात्यावर जमा करेल. व्याज परतावा योजना ऑनलाईन स्वरूपाची आहे. ऑन लाईन योजनेअंतर्गत www.vjnt.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी हा पर्याय निवडून ऑनलाईन अर्ज भरावा. आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर सादर करावीत. १ लाख थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार आहे. लाभार्थ्याने रु. २ हजार ८५ चा नियमित ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करणा-या लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही, परंतु थकीत हप्त्यांवर द.सा.द.शे.४% व्याजदर आकारण्यात येईल.
अधिक माहितीसाठी महामंडळाचे सातारा जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी बिल्डींग. सर्व्हे नं.२२ अ, जुनी एम. आय डी सी. रोड, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलाजवळ, सातारा, दूरध्वनी क ०२१६२ – २९५०६८ येथे संपर्क करावा
.


























