“वादविवाद सगळं विसरून जगत रहा… कारण मृत्यू पुन्हा भेटण्याची संधी देत नाही.”
समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क
आयुष्यात कोण बरोबर आणि कोण चूक यावर वाद घालण्यात अनेक नाती तुटतात. पण वेळ निघून गेल्यावर लक्षात येतं की जिंकलेला वाद उपयोगाचा नव्हता, हरवलेली माणसं मात्र परत मिळत नाहीत.
राग, अहंकार आणि गैरसमज काही क्षणांचे असतात; पण माणसं आयुष्यभरासाठी असतात. म्हणून शक्य असेल तिथे माफ करा, समजून घ्या आणि मनातला राग सोडून द्या. कारण उद्याचा दिवस कोणासाठी राखून ठेवलेला नसतो.
लक्षात ठेवा… मृत्यू दार ठोठावून येत नाही, आणि तो एकदा आला की पुन्हा भेटण्याची, “माफ कर” म्हणण्याची किंवा मिठी मारण्याची एकही संधी देत नाही. म्हणून जिवंत असताना प्रेमाने जगा, नाती जपा आणि प्रत्येक भेट शेवटची असू शकते याची जाणीव ठेवून माणुसकी जपा.
🙏 आयु – चंद्रकांत मोहिते सर🙏
🔹 केंद्रिय शिक्षक. बौद्धाचार्य🔹


























