Homeताज्या बातम्याशंकरराव भेलके महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

शंकरराव भेलके महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

पुणे भोर दि.१३| पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांना अभिवादन करण्यात आले. भोर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पुण्य नगरीचे पत्रकार जीवन सोनावणे, सकाळ वार्ताहर किरण बधे, पुढारी पत्रकार माणिक पवार, प्रभात पत्रकार विशाल शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या शुभहस्ते संस्थेचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष बाबुरावजी घोलप यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. ग्रंथप्रदर्शनामध्ये सामाजिक, राजकीय, अवांतर वाचन, चरित्रे, कथा, कादंबऱ्या, स्पर्धा परीक्षा इ. पुस्तकांचा समावेश होता, विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने ग्रंथप्रदर्शनामध्ये भाग घेतला.

प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी वाचन करणे महत्वाचे आहे, वाचनामुळे आपले जीवन समृद्ध होऊन समाज विकसित होतो, असे प्रतिपादन केले, यावेळी भोर पत्रकार संघाच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वाचन संस्कृती अभियान सुरु करण्यात आले, यामध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचून त्याचे अवलोकन करून जो विद्यार्थी वाचक जास्तीत जास्त पुस्तके वाचेल त्यास तसेच या अभियानामध्ये जे सहभागी होतील त्यामधून प्रथम तीन क्रमांकाचे पारितोषिक आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील, अशी माहिती सकाळचे पत्रकार किरण बधे तसेच पुढारीचे पत्रकार माणिक पवार यांनी दिली, आणि या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी सहदेव रोडे, प्रा.पौर्णिमा कारळे, डॉ.सचिन घाडगे, प्रा.गणपत आवटे, प्रा.जीवन गायकवाड, प्रा.दयानंद जाधवर, प्रा.माउली कोंडे, प्रा.महेश कोळपे, प्रा.भूषण समगीर, प्रा.ऐश्वर्या धुमाळ, प्रा.अंकिता महांगरे, सुमित कांबळे, अभिषेक मोरे इ. उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा.भगवान गावित यांनी केले. ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, सुमित कांबळे, अभिषेक मोरे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव* *शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची...

0
आदर्श शिक्षक पुरस्काराने उर्मिला बाळासो वसव यांचा गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण जय भवानी एज्युकेशन सोसायटी, गिरवी, ता. फलटण,...

*श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर**

0
# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर*   **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार**   **दालवडी, प्रतिनिधी :**...

# *श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दालवडी येथे मोफत नेत्र तपासणी*शिबिर* **विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी; लाईन्स मोदी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचा पुढाकार** समर्थ 24 तास...

*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी...

0
*दुष्काळ जाहीर, पण शेतकऱ्यांना दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या*! *स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमक मागणी; तहसीलदारांना निवेदन, आंदोलनाचा इशारा* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण **फलटण,...

*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव...

0
*ज्यांनी घडवलं आपल्या पिढ्यांना त्यांना वंदन करून निरोप देण्यासाठी सर्वपित्री अमावस्या दिवशी मिरगाव च्या वेताळबाबा मंदिरात महाआरती चे नियोजन* समर्थ 24 तास न्यूज नेटवर्क.फलटण फलटण पासून...

error: Content is protected !!